गोल्डन अपॉर्च्युनिटीज आयोजित ऑनलाइन कथा स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी रफीक आत्तार
गोल्डन अपॉर्च्युनिटीज तसेच श्री नरेंद्र लक्ष्मण लोहार व सौ यामिनी नरेंद्र लोहार यांच्या वतीने प्रेरणादायी कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढलेले नैराश्य यातून सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून ही स्पर्धा होती.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून स्पर्धकांचा सहभाग नोंदविला गेला होता.ही स्पर्धा गोल्डन अपाॅरच्युनिटीज चॅनलच्या माध्यमातून राबविण्यात आली होती.. या स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत सर्वोत्कृष्ट कथा कु.ऋतुजा रत्नहार पाटील.
उत्कृष्ट कथा कु.संपदा आंब्रे प्रथम क्रमांक श्री.धनराज रघुनाथ दुर्योधन – चंद्रपूर द्वितीय क्रमांक
सौ.जयश्री सतिष काळे पेरले
तृतीय क्रमांकरिया रुपेश पवार – दहिसर उत्तेजनार्थ क्रमांक कु.सानिका माने.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुदाम लगड, राजेंद्र वनराज लोहार, फिरोज शेख, हेमराज यमाजी वाघ, लोमेश वनराज लोहार, ईश्वर रामदास महाजन, पंकज नाले,पार्थ भेंडेकर यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी वनराज लिलाधर लोहार, लक्ष्मण चांगो लोहार, मनोज रामदास चव्हाण, मनोज भावलाल लोहार, राकेश लोहार आणि संपूर्ण मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळाल्या.सर्वांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले.सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच नरेंद्र लोहार सौ.यामिनी लोहार आणि गोल्डन अपाॅरच्युनिटीजच्या टिम ने सर्व विजेत्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






