फैजपूर येथे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कमी पोलीस दल…सुरक्षा व्यवस्था ठेवताना होते तारांबळ ….
फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी
फैजपूर पोलीस स्टेशन परिसर हद्दीतील पोलिसांची संख्या कमी असल्याने पोलिसांची तारांबळ उडत असते येथील फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत 28 गावी आहे आणि पोलिसांची संख्या केवळ 38 एवढी असून विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे एपीआय प्रकाश वानखेडे यांच्यासह पोलिसांची संख्या 38 असल्याने अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वेळेवर पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे आणि अनेकदा पोलिसांची तारांबळ उडत असते
येथील काही दिवसापूर्वी रुजू झालेले एपीआय प्रकाश निकम यांनी चोरांच्या तपास लावून अनेक गुन्हे उघडकीस आणले येथे तीन पीएसआय ची नेमणूक असून काही दिवसांपूर्वी काही पोलिसांच्या बदली झाली काही सेवानिवृत्त झाले त्यामुळे आज फैजपुरात कोणत्याही पीएसआयची नेमणूक झालेली नाही तेव्हापासून आजपर्यंत केवळ एक एपीआय प्रकाश वानखेडे हे कर्तव्य बजावत असून 28 गावांमध्ये कुठे ना कुठे काही ना काही घटना होत असतात त्यामुळे मात्र पोलिसांची तारांबळ उडत असते याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे





