Latur

महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणी खाजगी कोविड रुग्णालयात CCTV यंत्रणा कार्यान्वित करणे बाबत.

महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणी खाजगी कोविड रुग्णालयात CCTV यंत्रणा कार्यान्वित करणे बाबत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे व मा ना राजेशजी टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे कडे भिम आर्मीची मागणी
मागणी मान्य नाही झाल्यास भिम आर्मीसह समविचारी संघटना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याचा मुख्यमंत्री याना ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला इशारा

लक्ष्मण कांबळे लातूर

लातूर : गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय महाराष्ट्राची परिस्तिती बघता महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणी जिल्ह्यातील शासकीय आणी खाजगी कोविड रुग्णालय आणी त्यातील यंत्रणा निष्कामी ठरतेय त्यात रोजच्या रोज नवीन रुग्ण यांची भर पडतेय ही परिस्तिती पाहता शासकीय यंत्रणा (कोविड़ रुग्णालय ) मनमानी कारभार करतेय असे चित्र महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात बघावयास मिळते त्यात भर म्हणजे खाजगी रुग्णालय (कोविड़ 19)साठी ज्यांना परवानगी दिली आहे त्यांनी तर बाजार मांडला आहे.गोर गरीब जनतेकडे त्यांचे पुर्ण दुर्लक्ष झाले आहे परिणामी मृत्यु संख्या कमालीची वाढली आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर राज्यातील सर्वच शासकीय आणी खाजगी कोविड़ सेंटर घोषीत केलेल्या रुग्णालयात अद्ययावत CCTV यंत्रणा उभी करावी जेणे करुन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या बाबत काही बरे वाईट होत असेल तर ते प्रकार थांबतील..ब-याच तक्रारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या आहेत त्यात शासनाने सामान्य माणसाला कुठेही आधार मिळेल अशी उपाय योजना केलेली नाही.आणी महत्वाचे सरकारी व खाजगी शाळा तसेच कॉलेज ताब्यात घेऊन तेथे कोविड़ 19 सेंटर तथा क्वारंटाईन सेंटर सुरु करावे आणी प्रत्येक जिल्ह्यात रेमडेसिवीर चा माफक पुरवठा करावा आणी त्या संदर्भात माहिती फलक प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागात माहितीस्तव लावण्यात यावा.जेणे करुन रुग्ण नातेवाईक मित्र परिवाराची पळापळ होणार नाही आणी भविष्यात कमी जीव जातील यावर शासनाने लवकरात लवकर उपाय योजना कार्यान्वीत करावी..अन्यथा भीमआर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून सर्व समविचारी संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी..
महोदय परिस्थिती खुपच दयनीय झालेली आहे सामान्य माणूस पुर्ण पणे उध्वस्त झालेला आहे यावर लवकर अंमलबजावणी व्हावी याच अपेक्षेसह..आपणा कडे विनंती केलेली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button