Amalner

Amalner: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवस येथे संपन्न..!

Amalner: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवस येथे संपन्न..!

भरवस येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 150 उपकरणे सादर अमळनेर ग्रामीण
भागातील विद्यार्थी स्टार असतात ते कृतीतून प्रगती करतात विज्ञान प्रयोगातुन समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे मोठे काम होते असे प्रतिपादन विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटक प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी केले.

तालुक्यातील भरवस येथे पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुक्यातील कै. श्रीराम
गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय भरवस यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन मंगळवारी संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांदिपनी शिक्षण मंडळ भरवस चे अध्यक्ष संजय श्रीराम सोनवणे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अधिव्याख्याता डॉ डी बी साळुंखे, डॉ वैशाली पाटील गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, विस्तार अधिकारी पी. डी. धनगर, विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शिक्षक पतपेढी सचिव तुषार बोरसे, आर जे पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक भुपेंद्र बाविस्कर, शिक्षक संघटना समन्वयक मधुकर चौधरी, भरवसचे मुख्याध्यापक विजय सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. तर आभार आर आर सोनवणे यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button