चिमूर तालुक्यात रेती चोरटयांचा सुळसुळाट…
रेती चोरीकडे प्रशासनाची डोळेझाक…
चिमूर प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर जुमनाके
एकीकडे 144 कलम संचार बंदी कायदा सम्पूर्ण देशात लागू असतांना चंद्रपूर मधील चिमूर तालुक्यातील रेती तस्कर सर्वच नियम धाब्यावर बसऊन दिवस रात्र रेतीची चोरी करून महसूल विभागाचे फार मोठे नुकसान करीत आहे.
एकीकडे प्रशासनाचे कर्मचारी कोरोना संकटावर रात्र दिवस काम करीत असतांना याचा फायदा या रेती तस्करी करणाऱ्यांनी घेतलेला दिसत आहे. चोरीच्या मार्गानी हे रेती चोरी करीत असून याकडे कुणाचेच लक्ष दिसत नाही असे चित्र चिमूर तालुक्यात दिसून येत आहेत रेती चोरट्यांनी नवीन नवीन शक्कल लढवीत चोर वाटा शोधून काढल्या आहेत ह्या वाटा प्रशासनातील अजून पर्यत माहीत नाही का हा प्रश्न सुद्धा आज निर्माण झाला आहे या रेती चोरट्यांनी जणू चिमूर तालुक्यात रेतीचा धुमाकूळ घातला आहे याला जबाबदार कोण ?
आज जगावर कोरोना सारखा मोठा संकट असतांना रेतीची गाडी भरण्यासाठी 5 ते 6 मजूर एकत्र येत आहेत यांच्या मध्ये कुठलेही सोशल डिस्टन्स नाहीत यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवीत सर्हास पणे आपले रेती चोरीचे धंदे सुरूच ठेवले आहे. यांना वेगळा कायदा आहे काय? या रेती तस्करी करणाऱ्यांना कुणाच आशीर्वाद आहे हेच कळेनासे झाले आहे हाच प्रश्न चिमुरच्या जनतेला पडला आहे.
रात्री व पहाटेच्या सुमारास मांसळ मार्ग व वेगवेगळ्या मार्गाने ही रेतीची चोरी सुरु आहे पण यांना कुणी अडवणारे नाहीत काय जर यांनी आपला रेती चोरीचा धंदा असाच चालू ठेवला तर शासनाला लाखो रुपयांचा नुकसान होणार नाही काय रेती तस्करीमध्ये कमी मेहनतीत जास्त फायदा असल्याने काही नवीन तस्करांनी सुद्धा ऊडी घेतली आहे आता काही राजकीय लोक सुद्धा या धंद्यात आपले नशीब आजमावित आहेत अश्या रेती तस्करी करणाऱ्या वर प्रशासनातील लोकांनी नजर ठेवून यांना 144 संचार बंदी कायदा व चोरीची रेती घेण्यात येणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.






