मा. उपसरपंच वर्डी येथील बारकू पाटील यांचे भाजपा मध्ये प्रवेश….
लतीश जैन
चोपडा (प्रतिनिधी ):-चोपडा तालुक्यातील वर्डी येथील मा. उपसरपंच बारकू लक्ष्मण पाटील यांचे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश.. त्याप्रसंगी त्यांचे प्रवेश हा भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा. आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत झाला.
प्रवेश केल्यानांतर बारकू पाटील व त्यांचे कार्यकर्ते यांनी पक्ष वाढी साठी आम्ही कटिबद्ध राहू हे आश्वासन भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा. राजूमामा भोळे यांना विश्वास दिला.
त्यावेळी उपस्थित मान्यवर मा. प्रदीप पाटील, मा. पंकज पाटील, मा. प्रकाश पाटील, मा. राकेश दादा पाटील, मा. नरेंद्र पाटील, मा. विकास पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.






