Kolhapur

आईच्या पुण्यतिथीनिमित्त चेअरमन बाळ डेळेकर यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी….

आईच्या पुण्यतिथीनिमित्त चेअरमन बाळ डेळेकर यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी….

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : आई कै .हौसाबाई सखाराम डेळेकर यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित कोजिमाशिचे चेअरमन , शिक्षण प्रसारक मंडळाचे कौन्सिल सदस्य, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळ उर्फ लक्ष्मण डेळेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली प्रशांत डेळेकर, सुशांत डेळेकर,जगदीश गुरव,शिवम प्रतिष्ठानचे मसोमनाथ येरनाळकर,समीर रावण,विनायक म्हेतर,अनिल रावण,
किशोर चौगले, सौरभ परीट, सचिन सुतार यांनी ग्रामीण रूग्णालय मुरगूड येथील कोविड सेंटर रूग्णांना व तसेच डॉक्टर, नर्स,व सर्व स्टाफ यांना केळी, बिस्कीट, अंडी याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली .
आईच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपून डेळेकर कुंटुबियानी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button