जनतेला अडचणीच्या काळात मदत करण्यासाठीच मनसे शाखेची स्थापना,, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे
खेडभोसे येथील कोरोना योध्याचा मनसे गौरव
प्रतिनिधी
रफिक आतार
सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली असून यापुढे कोणतीही अडचण असेल तर मनसेशी संपर्क करा असे आवाहन खेडभोसे येथील मनसे शाखा उदघाटन प्रसंगी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केले,मनसे तालुका उपाध्यक्ष हेमंत पवार यांनी आयोजित केलेल्या मनसे शाखा आणि कोरोना योद्धा मनसे गौरव पुरस्कार समारंभ या प्रसंगी ते बोलत होते,,
धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,,
कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत केली आहे,,
रक्तदान शिबिर, धान्य वाटप, अन्नदान वाटप, मास्क, सॅनिटाइझर, पीपीइ किट, दवाखान्यात बेड मिळवून देणे इत्यादी मदत मनसेच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी सांगितले,धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांचा संपुर्ण ऊस गाळप करणार असून कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, आम्ही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठीच सांगोला कारखाना सुरू केला असून दर 15 दिवसाला ऊसाचे ऊसाचे बिल देण्यात येत आहे.कोणत्याही वजन काट्यावर वजन करून आपले ऊसाचे वाहन पाठवण्याचे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अभिजित पाटील यांनी केले,
यावेळी कोरोनाच्या संकटात जनतेला मदत करणाऱ्या सर्व कोरोना योध्याचा मनसे गौरव करण्यात आला,,
कार्यक्रमाचे आयोजन मनसे तालुका उपाध्यक्ष हेमंत पवार यांनी केले होते, यावेळी हेमंत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा ही मनसे सन्मान करण्यात आला,,यावेळी दिलीप धोत्रे ,धाराशिव साखर चे चेअरमन अभिजित पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र पवार,विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, सहकार सेना अध्यक्ष कृष्णा मासाळ,शुभम काकडे,तात्याराम पवार, तेजस गांजले, यशवंतराव पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, संचालक बंडू पवार, खेड भोसे शाखा अध्यक्ष विजय पवार,उपाध्यक्ष गणेश पाटील, सचिव गणेश सुतार,सर्व ग्रामस्थ उपस्थित होते,,यावेळी कोरोना योद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे साहेब, गणपत मोरे, गावातील सर्व आशा ताई ,ग्रामसेवक भिंगारे, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य इत्यादी चा मनसे गौरव करण्यात आला,,,
आभार हेमंत पवार यांनी मानले,,,






