Bid

नागरीकांच्या जिवाशी खेळू नका नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करा -उत्तरेश्वर कांबळे

नागरीकांच्या जिवाशी खेळू नका नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार करा -उत्तरेश्वर कांबळे

लक्ष्मण कांबळे बीड

Beed : आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असुन सुर्डी, किन्ही, पारगाव जोगेश्वरी येथील 3 जणांचा त्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गेलेला आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळू नका त्या नरभक्षक बिबट्याला शार्पशुटर आणून गोळ्या घालून ठार करा अशी संतप्त प्रतिक्रिया भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी दिली आहे.ते हल्यात मृत्यू झालेल्या पारगाव जोगेश्वरी येथे सुरेखा भोसले यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन करण्यासाठी आले असता बोलतं होते.
यापूर्वी या परिसरात कधीच बिबट्या आढळला नव्हता मग तो अचानक आलाच कसा? याची सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे
वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 150 कर्मचारी, आधिकारी यांचा फौजफाटा तैनात केला आहे .परंतु अद्यापही बिबट्याला ते जेरबंद करण्यात यशस्वी झाले नाहीत.बिबट्याच्या वाढत्या दहशतीने परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत. कोणी शेतावर जायला तयार नाही.वन्यजीव पेक्षा माणूस महत्त्वाचा आहे म्हणून
वनविभागाने वेळ वाया न घालवता तातडीने शार्प शुटर बोलावून नरभक्षक बिबट्याला ठार करावे असे उत्तरेश्वर कांबळे म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button