Amalner

? अगं अगं खा.शि. किती खाशी…खान्देश शिक्षण मंडळाचे नाव बदलून खादाड शिक्षण मंडळ?

? अगं अगं खा.शि. किती खाशी…खान्देश शिक्षण मंडळाचे नाव बदलून खादाड शिक्षण मंडळ?

? स्वकमाई करणाऱ्या वेश्यांची गल्ली बदनाम नाही तर विद्यार्थ्यांच्या पैशांवर डल्ला मारणारी खा. शि. ची गल्ली बदनाम….

प्रा जयश्री दाभाडे

खान्देश शिक्षण संस्थेच्या स्थापने मागे खूप मोठा इतिहास आहे.स्वातंत्र्य सैनिक , शिक्षक पू. सानेगुरुजी यांच्या कार्यशैलीने, श्रीमंत प्रताप शेटजींच्या दातृत्वाने, प्रताप महाविद्यालयाच्या माजी शिक्षक, विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रात खान्देश शिक्षण मंडळ ही संस्था नावा रुपाला आली आहे.एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रताप महाविद्यालयाचे नावलौकिक होते.या महाविद्यालयात इतर शहरांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.तसा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता टिकवून ठेवली होती.

मात्र गेल्या काही वर्षात खान्देश शिक्षण मंडळाची दिशा आणि दशा बदलली आहे. खान्देश शिक्षण मंडळाच्या अनेक प्राथमिक, माध्यमिक, स्वतंत्र मुलींच्या प्राथमिक ते माध्यमिक शाळा, महाविद्यालय आहेत.त्याच प्रमाणे अनेक विद्यापिठ स्तरीय कोर्सेस या विविध शाळा महाविद्यालयात राबविले जात असत.उदा डीफार्मसी, संगणक शास्त्र आजच्या वर्तमान स्थितीत मात्र अनेक महाविद्यालयात विभाग आणि शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे NAAC सारख्या मूल्यांकन समितीनेही कमी दर्जा दिला आहे.परन्तु या सर्व गोष्टींचा संस्थेच्या कार्यकारणी वर सदस्यांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही. विस्ताराने मोठ्या जमीनीचा विस्तार आणि विकास करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

? जाती पातीचे राजकारण

सध्या एकेकाळी शिक्षणासाठी नावलौकिक असलेली संस्था आज जाती पातीच्या राजकारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम आहे.खूप मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचारासाठी बदनाम आहे.पूर्वी ज्या परिसरात फक्त आणि फक्त शिक्षण,शिक्षक,प्राध्यापक, वाचनालय,चर्चा,परिषदा,अभ्यासक्रम, गुणवत्ता इ ची चर्चा होत असे आज तो जातीय राजकारणाचा अड्डा बनला आहे. भ्रष्ट्राचाराचा मोठा ओघ या परिसरातून वाहतो. विद्यार्थी देखील याच वातावरणात शिकत असल्याने अमळनेर शहरातील युवा पिढीचे भविष्य धोक्यात आले आहे.

संस्थेच्या मागील काही निवडणुका पैशाच्या व जाती पातीच्या आधाराने झाल्या. खान्देश शिक्षण मंडळ विकलं गेलं आहे ठराविक लोकांची दादागिरी आणि मनमानी कारभार सुरू आहे.संचालकांच्या आर्थिक वाटाघाटीतून होणारे जाहीर वादविवादांमुळे शिक्षण क्षेत्रातील संस्था बदनाम झाली आहे. ज्या सभासदांकडून कार्यकारणीतील सदस्य यांच्या कडून निषेधाची, विरोधाची अपेक्षा होती त्यांनी ही आपला स्वार्थ साधून शस्त्र टाकून दिली आहेत.

एकाच परिवारातील वयोमर्यादा पूर्ण नसलेले सभासद आपल्या फायद्यासाठी करून घेतले जातात.एव्हढ्याश्या निवडणुकीत पैशांचा महापूर वाहतो,भरती प्रक्रिया खोटी केली जाते.तेव्हढा पैसाही कमविला जातो. नवीन सभासद नोंदणी केली जात नाही, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना सभासदत्व दिले जात नाही.जे एक दोन सभासद आहेत ते जुने आहेत. उच्च वर्णीय मात्र सर्रास पणे सभासद होतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button