Dhule

कोडीद येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा”

“कोडीद येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती महोत्सव साजरा”

प्रतिनिधी : राहुल साळुंके धुळे


धुळे : शिरपूर तालुक्यातील कोडीद गाव व परिसरातील सुजाण युवा-युवती परिसरातील सर्व नागरिक ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ नोव्हेंबर २०२०रोजी भगवान बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला.
ह्यानिमित्त कोडीद गावातील मुख्य चौकात हा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
ह्यावेळी कोडीद गावातील बुजुर्ग लोकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्यांच्या स्मारकास व क्रांतीसुर्य बिरसा मुंडा ह्यांच्या प्रतिमेस पूजा करून पुष्पाहार अर्पण करण्यात आले.

ह्यावेळी उपस्थित जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, रणजित पावरा, कनवर पावरा, सनी पावरा, डॉ.मंगेश बर्डे, महेंद्र सोनवणे, राजू गुलाले, अमोल गुलाले, अखिल खाटीक, नुरू बोहरी, इद्रिस बोहरी, बॉबी गुलाले, नटराज पावरा, वामन मुखडे, कुणाल पावरा, अशोक पावरा, मुकेश ईशी, राजू गुलाले, अमाश्या पावरा, सागर पावरा, मुन्ना बिऱ्हाडे, रोहित ईशी, गोविंदा पावरा आदी उपस्थित होते
सर्वांचे आभार डॉ.हिरा पावरा ह्यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button