Pandharpur

ऊसतोडणी कामगारांसाठी मोफत रोगनिदान व औषधउपचार शिबिर संपन्न

ऊसतोडणी कामगारांसाठी मोफत रोगनिदान व औषधउपचार शिबिर संपन्न

प्रतिनिधी
रफिक आतार

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना ,भाळवणी ता पंढरपूर येथे बुधवार दि 15 डिसेंबर रोजी,जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर च्या वतीने,ऊसतोडणी कामगार व इतरांसाठी मोफत रोगनिदान व औषध उपचार शिबीर घेण्यात आले, यामध्ये 120 रुग्णांनी याचा लाभ घेतला.स्व वसंतदादा काळे यांच्या प्रेरणेने , सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चे चेअरमन ,मा कल्याणराव काळे यांनी सर्व सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूरमध्ये,50 बेड च्या हॉस्पिटल ची उभारणी केली, ऊसतोडणी कामगार हे परगावाहून कारखान्याकडे काम करणेसाठी आलेले असतात,त्यांचे सोबत लहान मुले, वयस्कर कुटुंबीय ही असतात,दिवसभर ऊसतोडणी कामामुळे त्यांचेतील कोणी आजारी पडले तरी ते योग्य उपचार घेऊ शकत नाहीत, आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना आरोग्यासाठी सुद्धा खर्च करणे परवडत नाही ,या विचाराने मा कल्याणराव काळे साहेब यांचे मार्गदर्शनानुसार,आज कारखाना कार्यस्थळावर जनकल्याण हॉस्पिटल च्या वतीने ,डॉक्टर्स आपल्या दारी ,या संकल्पनेतून,आरोग्य शिबीर घेण्यात आले, यामध्ये डॉ सुधीर शिनगारे यांनी सर्वाना आरोग्याची काळजी घेणे कसे आवश्यक आहे हे सांगितले, मा कल्याणराव काळे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली ,कार्यरत असलेल्या जनकल्याण हॉस्पिटल बाबत माहिती दिली, गरीब व गरजू रुग्णासाठी हॉस्पिटलमध्ये असलेल्या योजनांबाबत सविस्तर चर्चा केली .सदर कार्यक्रमास कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री झुंजार आसबे व शेतीविभाग अधिकारी ,इतरांचे सहकार्य लाभले,सदर शिबीरामध्ये डॉ सौ जयश्री शिनगारे,डॉ अमृता म्हेत्रे,डॉ आनंद कुलकर्णी सर ,यांनी मोफत रुग्ण तपासणी करून औषध उपचार दिले, जनकल्याण हॉस्पिटल मधील व्यवस्थापक सद्दाम मनेरी, प्रीती मोरे,आकाश पोरे यांनी परिश्रम घेतले,यावेळी श्री हरिदास गिड्डे,श्री कवडे,व इतर आधिकारी,कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button