आदिवासी संघर्ष समितीच्या आक्रोश मोर्चात सहभागी व्हा : नितीन कांडेलकर
रजनीकांत पाटील यावल
यावल : माजी मंत्री दशरथ भांडे साहेब यांचा उपस्थित ९ डिसेंबर रोजी मुंबईत आदिवासी संघर्ष समितीचा माध्यमातून समाजाच्या जातीचा दाखला, वैद्य प्रमाणपत्र सह विविध समस्यांचा होणारा त्रास सहन करावा लागत असुन शासन समस्यां सोडविण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन समाज बांधवानी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर यांनी यावल येथे कोळी समाज बांधवाच्या बैठकीत केले.
यावल येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यलयात आदिवासी संघर्ष समीतीची बैठक जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर यांचा उपस्थित सपन्न झाली. यावेळी जि.प.गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, संयोजक अँड गणेश सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे ,महिला जिल्हाध्यक्ष सुनिताताई तायडे ,संजय कांडेलकर ,समाधान मोरे, मनोहर कोळी ,प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.






