Dewala

देवळा पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

देवळा पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

महेश शिरोरे

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देवळा पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले . यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले . देवळा तालुक्यातील नागरीक पोलिस ठाण्यात आपली कैफियत घेवून येतात तसेच प्रत्येक पोलिस जिवाची परवा न करता पोलिस कर्मचारी रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत म्हणून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे त्यामुळे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सब सोनेरी एक लोहोणेरी मित्र मंडळा कडुन मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देत पोलिस निरीक्षक सुहास देशमुख, पोलिस उपनिरीक्षक संजय मार्तोंडकर, पोलिस उपनिरीक्षक संजय वाघमारे, सचिन भामरे, निलेश सावकार सुदर्शन गायकवाड, दरगुडे, रवींद्र मल्ले यांच्या प्रमुख उपस्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वापट करण्यात आले .
यावेळी सब सोनेरी एक लोहोणेरी मित्रमंडळाचे चे रमेश आहिरे, सोपान सोनवणे आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व पोलिसांनी सब सोनेरी एक लोहोणेरी मित्रमंडळाचे आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button