Rawer

माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे आवाहन..

माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्याचे आवाहन..

भिमराव कोचुरे

जिमाका.(वृत्तसेवा) सर्वसामान्य जनतेमध्ये माहिती अधिकार बाबत व्यापक प्रमाणात जन जागृती होण्यासाठी दि.६ते१२ऑक्टोबर२०२०हा सप्ताह म्हणून साजरा करणे बाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांनी .स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाज सेवी संस्थांच्या मदतीने समाज कार्या करीता व इच्छुक गटा करिता भित्ती पत्र स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यान माला. आदी उपक्रमांचे आयोजन करावे .या उपक्रमांसाठी पारितोषिकां ची व्यवस्था लायन्स क्लब व रोटरी क्लब या सारख्या विविध समाज सेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी . माहिती चा अधिकार सप्ताह साजरा करून या बाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी सदर सप्ताह साजरा करीत असताना कोविड १९बाबत शासनाच्या निर्देशांचे काटे कोर पालन करण्यात यावे. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका पत्रकानव्ये कळविण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button