श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा (सा वा ) दि. १०
परंडा- भूम- वाशी वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह शहरातील मंगळवार पेठेत शिवराम बुवा मठामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताह कालावधीमध्ये स. ४ ते ६ काकड आरती, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हरिपाठ आणि उपासना व रात्री ८:३० ते १०:३० यावेळी हरिकीर्तन आणि हरिजागर करण्यात येणार तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात ११ फेब्रुवारी रोजी होणार असून सांगता १८ फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवार दि.११ रोजी मान्यवरांच्या हस्ते मंत्रपुष्पांजली होऊन सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार आहे. सप्ताहामध्ये दररोज पहाटे ४ ते ६ या वेळेमध्ये काकडा व भजन, ६ ते ७ विष्णुसहस्रनामावली, ७ ते १० श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच ११ ते १ गाथा भजन, दुपारी ४:३० ते ५:३० प्रवचन, हरिपाठ ६ ते ७, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन होईल. मंगळवार दि.११ रोजी ह.भ.प.महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन, बुधवार दि.१२ रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज गिरी यांचे कीर्तन, गुरुवार दि.१३ रोजी ह. भ. प.मारुती महाराज यांचे कीर्तन, शुक्रवार दि.१४ रोजी ह. भ. प. केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन, तसेच दुपारी ३ ते ४:३० या वेळेमध्ये अँड. श्रीमती अपर्णाताई रामातिर्थकर यांचे व्याख्यान, शनिवार दि.१५ रोजी ह.भ. प. संजय महाराज यांचे कीर्तन, रविवार दि.१६ रोजी ह.भ.प. गणेश महाराज पाटील यांचे कीर्तन, सोमवार दि. १७ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये श्रीगुरु हरिभाऊ महाराज पाटील यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञान भक्ती सेवा पुरस्कार चिंचगाव टेकडी येथील स्वामी रामानंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले यांना देण्यात येणार आहे, तर रात्री ८ :३० ते १० :३० वा. अँड. जयवंत महाराज बोधले यांचे हरिकिर्तन व गुरुवार दि. १८ रोजी दुपारी १० ते १२ या वेळेमध्ये ह.भ.प. विद्वतरत्न पुंडलिक महाराज जंगले (शास्त्री) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून सप्ताहाची सांगता होईल. तरी महाराष्ट्रातील तमाम भक्तांनी सप्ताहामध्ये उपस्थित राहून स्वर्गसुखाचा आनंद घ्यावा,असे आवाहन ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुके, ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे, ह.भ.प. कुमार महाराज केमदारणे, ह.भ.प. सतिश महाराज कदम, ह.भ.प. नागेश महाराज मांजरे व परंडा- भूम- वाशी वारकरी सांप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.






