संत रोहिदास महाराज जयंतीचा शासकीय कार्यलायाला विसर
शासनाच्या आदेशाला आधिकाऱ्या कडून केराची टोपली
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा ( सा.वा )दि १०
संत रोहिदास महाराज यांची ६४४ वी जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे स्पष्ट आदेश आसताना परंडा येथिल अनेक कार्यालयात जयंती साजरी केली गेली नसल्याने सबंधीत आधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रा . चर्मकार महासंघ तालुका अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी केली आहे .
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर २०१९ रोजी परिपत्रक काढून सन २०२० मध्ये राष्ट्र पुरुष , थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करण्या संदर्भात सर्व शासकीय निम शासकीय कार्यलयाला आदेशीत केले होते दि ९ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती असताना देखील , तालुका कृषी कार्यालय , दुय्यम निबंधक , गटशिक्षण आधिकारी , माहिला व बालविकास कार्यलय , पशु सवर्धन कार्यालय , उप विभागीय अभियंता जिप लघु पाटबंधारे , विद्युत वितरण कार्यालय , धाराशिव पाटबंधारे उप विभागीय कार्यालय , उप विभागीय मृदु व जलसंधारण कार्यालय , कुंडलीका प्रकल उप विभाग , सामाजिक वनिकरण विभाग , तालुका अधिक्षक भुमि अभिलेख , नगर परिषद या बारा कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी केली नाही .
तर तहसिल कार्यालय , पंचायत समीती कार्यालय , सार्वजनिक बांधकाम उप विभाग , सिना कोळेगाव प्रकल्प या चार कार्यालयात कर्मचाऱ्यांनी जयंती साजरी केली मात्र आधिकारी गैर हजर राहिले .
अनेक कार्यालयात संत रोहिदास महाराज यांचे फोटो देखील लावलेले नाही अधिकारी व कर्मचारी यांचे मनमानी कारभार सुरू असुन जिल्हा आधिकारी यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी .
राष्ट्र पुरुष व थोर व्यक्तीचे जयंती साजरी करताना सार्वजनिक सुट्टी , दुसरा व चौथा शनिवार अथवा रविवार येत असल्यास केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्या प्रमाणे साजरे करावे अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करावे असे आदेश आहेत .






