Yawal

यावलला सर्पमित्रांकडून जखमी सापाला जीवदान ; योग्य उपचार केल्यानंतर सोडले अभयारण्यात

यावलला सर्पमित्रांकडून जखमी सापाला जीवदान ; योग्य उपचार केल्यानंतर सोडले अभयारण्यात

रजनीकांत पाटील
प्रतिनिधी यावल ::> शहरालगत असलेल्या शेतीशिवारात शेतकऱ्याचा मित्र असलेला बिनविशारी धामण जातीच्या साप नुकताच जमखी अवस्थेत आढळला होता. या सापाला शहरातील सर्पमित्र जयवंत माळी व उज्ज्वल कानडे यांनी जीवदान दिले. जखमी सापावर उपचार करून त्यास जंगलात सोडण्यात आले.

शहराला लागून असलेल्या शेती परिसरात एका शेतकऱ्याला जखमी धामण सर्प अाढळला. त्यामुळे शहरातील सर्पमित्र जयवंत माळी, उज्ज्वल कानडे यांना शेतकऱ्याने याबाबत माहिती दिली. सर्पमित्रांनी जखमी सर्पाला पकडून शहरातील पशू चिकित्सक डॉ. विवेक अडकमोल यांच्याकडे आणले. डॉ.अडकमोल यांनी सापावर उपचार केले. त्यामुळे सापाला जीवदान मिळाले. उपचारानंतर या सापाला सर्पमित्रांनी यावल अभयारण्यात सोडले.

सर्पमित्रांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतूक होत आहे. परिसरात सर्प आढळून आल्यास नागरिकांनी त्याला मारू नये, सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. वर्षाला शेकडो टन धान्य फस्त करणाऱ्या उंदरांची संख्या सापांमुळेच नियंत्रणात येते, त्यामुळे सापांना मारू नये, असेही सर्पमित्र माळी यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button