Maharashtra

वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ‘विकास वृक्ष’ उपक्रम

वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ‘विकास वृक्ष’ उपक्रम

प्रतिनिधी प्रशांत नेटके

लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ‘विकास वृक्ष’ हा वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामीण भागात वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ३०१ झाडे लावण्यात आली.यात गंगापूर, भुसणी काटगाव,गाधवड,जोडजवळा, लातुर शहर,आदी ठिकाणांचा समावेश आहे. या उपक्रमात लागवड करण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा,जिल्हाध्यक्ष उमाकांत मुंडलीक,सचिव रामेश्वर बावळे,अमोल स्वामी,प्रशांत स्वामी आदी परिश्रम घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसुंधरा प्रतिष्ठान कडून विविध जनजागृती अभियान राबविले जात असून ,घरीच राहा,सुरक्षित राहा,कोरोनाला हरवा,
असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button