रावेर

रावेर विधानसभा मतदारसंघात शिरीषदादा चौधरी यांची मोर्चेबांधणीत सरशी ..

आखाडा विधानसभेचा…..
रावेर विधानसभा मतदारसंघात 
शिरीषदादा चौधरी यांची 
 मोर्चेबांधणीत सरशी ..

रावेर विधानसभा मतदारसंघात शिरीषदादा चौधरी यांची मोर्चेबांधणीत सरशी ..


रावेर प्रतिनिधी विलास ताठे
रावेर विधानसभा 2019  निवडणुकीचे बिगूल वाजले असून यात आघाडीचे उमेदवार म्हणून जवळपास रावेरात काॅग्रेस चे शिरीष दादा चौधरी यांच्या वर
एकमत काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सह मित्र पक्षाच्या प्रमुख नेते व स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते यांनी शिरीष चौधरी यांच्या पाठीशी 
ठामपणे उभे केले आहे, याच धर्तीवर आणि कै. मधुकरराव चौधरी माजी मंत्री व विधानसभा अध्यक्ष यांची  पुण्याई सह स्वतः शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून याआधी निवडणूक जिंकून ते पुन्हा आघाडीचे सहकारी म्हणून विधान भवनात उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेली आहे, तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील गावा  गावातील  गल्ली,बोंळ,  तांडया, पासून ते प्रमुख शहरांमध्ये त्यांची पकड आता पासूनच वाढली आहे, कारण गेल्या दोन वर्षांपासून चं ते सक्रिय  कार्यकर्ता वलय आणि सुख दुःखात, सण, उत्सव  ते मोठ्या आवडीने व एक दिलाने सर्व समाज बांधव यांच्यात नेहमीच एकरूप झाल्याने त्यांचा चाहता  युवा वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून त्यासाठी त्यांचा मुलगा धनंजय चौधरी, हा सुध्दा आपल्या वडिलांना रावेर चा आमदार बनविण्यासाठी एक प्रकारे दिवस रात्र एक करून त्यानेही मोठ्या प्रमाणात युवकांची मोठी फळी रावेर विधानसभा मतदारसंघात 
उभी केली आहे, तसेच बाळासाहेब यांच्या अनमोल कार्याची प्रत्यक्ष प्रचिती रावेर तालुका सह संपूर्ण यावल तालुक्यातील शेतकरी वर्गाला येत आहे, कारण गेल्या सुमारे चार ते पाच वर्षांत समाधान कारक पाऊस नसल्याने कै मधुकर राव चौधरी, यांनी जे पाल येथे गार बरडी धरण सुक्या नदीवर दूर दृष्टीने बांधले तसेच एक लोहारा येथे लहान धरण बांधून यातून दोन उजवा व डावा कालवा निर्माण केला यामुळे आजही रावेर यावल तालुक्यातील शेतकरी खरा सुखावला आहे, तसेच शिरीष चौधरी यांनी यावर्षी  जल थेंब  अमुताचा या मोहिमेत 
पाणी आडवा पाणी जिरवा,ठिक  ठिकाणी चर, पुनर्भरण विहीरी, शक्य तेथे  खड्डे याकामी  ते स्वतःच उन्हाळ्यात पाय रोवून खंबीरपणे उभे राहिले आणि आज भरपूर पाणी पाऊस पडत असल्याने रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी वर्गाला हि  एक पर्वणीच ठरली आहे,
त्याचप्रमाणे शिरीष चौधरी यांनी त्यांच्या आमदार कि च्या काळात  जवळपास सर्वच गावात विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने व प्रत्यक्षदर्शी त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात परिसरातील विकास कामे प्रगती पथावर असल्याने त्यांना आता प्रत्येक गावात भरभरून प्रतिसाद कार्यकर्त्या मेळाव्यात मिळत आहे, आणि याच विश्वासाच्या जोराने त्यांच्यातील ऊर्जा दुपटीने जागृत झाली आहे, तसेच भाजपचे नेते हरीभाऊ जावळे यांनी शरद महाजन यांचा भाजप प्रवेश करून जी कुरघोडी केलीय, यांचा फार मोठा परिणाम  येत्या विधानसभा निवडणुकीत होणार नाही, असे ते म्हणतात, कारण मला साथ खंबीर कार्यकर्त्यांची लाभत आहे, माझी लढाई ही विचारांची लढाई आहे, मी फक्त रावेर विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेच्या मनातील विकासासाठी प्रयत्न करणारा माध्यम म्हणून निवडूक  लढतोय, मला तरूणांना रोजगार निर्मिती. केळी उत्पादकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी. या मतदारसंघात उद्योग धंदे,  रावेर, फैजपूर , यावल, येथे छोट्या स्वरूपात एम आय डि सी. विकसित करून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी. समस्त रावेर, यावल तालुक्यातील अंतर्गत रस्ते, पाणी आणि प्राथमिक सुख सुविधा उपलब्ध करण्यासाठी. आरोग्य केंद्रात गोरगरिबांना रात्रीच्या वेळी शक्य ती स्वरूपात औषध पाणी पुरवठा. तसेच मुला मुलीच्या बाबतीत  शिक्षण, कला गुणांना वाव मिळण्यासाठी, पटांगणे, गाव तेथे व्यायाम शाळा. वाचनालय जेणेकरून एम. पी. एस सी. यु. पी. एस सी 
सारख्या स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, व भावी पिढी तहसीलदार, जिल्हाधिकारी. ग्रामसेवक, आय पी. एस अधिकारी म्हणून काम करत राहिली पाहिजे, म्हणजे समस्त समाज हा सर्वगुणसंपन्न होऊन  रावेर विधानसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत बेरोजगारी तोंड वर न काढता सदा रावेर, यावल तालुक्यातील भाई चारा एक मिसाल इतरांसाठी  बनली पाहिजे, यासाठी मी उमेदवार म्हणून जनतेत जात आहे, आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्दन मला भरभरून मताचा आशीर्वाद देईल यांची ग्वाही मला आहे. 
अशा प्रचंड 
आत्मविश्वासाने शिरीष चौधरी यांनी रावेर विधानसभा मतदारसंघात गाठीभेटी, बुथ मेळावे, आयोजित करून त्यांची कार्यकर्ता मोर्चेबांधणी इतरांपेक्षा जास्त सरस व शिस्तबद्ध आहे. 
याउलट भाजप मध्ये हरीभाऊ जावळे, कि श्रीराम पाटील उमेदवार होऊ शकतात या द्विधा मनस्थितीत भाजप कार्यकर्ते संभ्रमात आहेत. तर अपक्ष उमेदवार म्हणून अनिल चौधरी, रिंगणात असल्याने तेही सध्या खान्देशातील मोठे नेते 
 गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून अनिल चौधरी, ओळखले जातात. यात भर म्हणजे शरद महाजन यांचा  भाजपात प्रवेश  यामुळे एक प्रकारे  रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपा मध्ये कलीयुगी तुरा रंगेल काय अशीच शक्यता वाटते आहे,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button