रावेर नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांचा पीकांचे नुकसानीचा पाहाणी दौरा…
रावेर विद्यमान आमदार शिरीष दादा चौधरी यांनी रावेर परीसरात पीक नुकसानीची केली पाहणी करून त्वरीत पंचनामे करण्याचे प्रशासनाला सुचना दिल्या.
रावेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात ज्वारी.कपाशी सोयाबीन व मका पिकाचे नुकसान झाले असून सदर शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. शिरीष चौधरी यांनी संवेदनशील ता दाखवून याबाबत संबंधित शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्याशी
हितगुज करुन झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून त्यांना दिलासा देवून तात्काळ जळगाव जिल्हा अधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याशी संपर्क साधून स्थानिक पातळीवर अधिकारी अजित थोरबोले सह रावेर यावल तहसीलदार.कुषीअधिकारी यांना त्वरीत पीकांचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ सुरेखा पाटील. चिनावल माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे.किशोर बोरोले.कलपेश नेमाडे.बापू पाटील.परमोद नेमाडे सह अनेक मान्यवर पीकांचे नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यात सहभागी होते.






