घरपट्टी वाढ तत्काळ मागे घेण्यासाठी त्वरित योग्य ती कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे जन आंदोलन संघर्ष समितीस सत्ताधाऱ्यांचे आश्वासन
चोपडा:प्रतिनिधी सचिन जयस्वाल
येथील नगरपरिषदेच्या पदाधिकार्यांनी आज तातडीने जन आंदोलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेत घरपट्टी वाढ मागे घेण्याविषयी आपण अनुकूल असल्याचे सुतोवाच करत तत्काळ कायदेशीर पावले उचलली जाणार असल्याचे विषद केले. शहरातील नागरिकांचा जनक्षोभ आणि दुष्काळी परिस्थिती पाहता मुख्याधिकारी यांच्या भूमिकेच्या उलट घरपट्टी वाढ रद्द करण्याविषयी न.प.सत्ताधारींनी आपली भूमिका जाहीर केली. व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव यांच्या कार्यालयात झालेल्या सदरच्या बैठकीत गटनेते जीवन चौधरी, राजु देशमुख, रमेश शिंदे यांनी प्रत्यक्ष चर्चेत भाग घेत हे आश्वासन दिले. मुख्याधिकार्यांनी जन आंदोलन संघर्ष समिती च्या निवेदनावर दिलेल्या परस्पर उत्तराबाबत सत्ताधारींनी स्पष्ट पणे अनभिज्ञता व्यक्त केली. समितीच्या वतीने चर्चेत सर्व श्री अनिल वानखेडे, दिलीप नेवे, अजय पालीवाल, सुशिल टाटिया, यशवंत चौधरी, प्रफुल्ल स्वामी, सचिन जैस्वाल, प्रविण लोहार आदिंनी चर्चेत भाग घेतला. जनहिताच्या या संघर्षास समर्थन देणारे डॉ रवींद्र पाटील, नरेश महाजन हे देखील याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते.







