Maharashtra

कोरोनाला घाबरून अनेकांचा गावाकडे पळ ग्रामीण भागात वाढू लागली संख्या

कोरोनाला घाबरून अनेकांचा गावाकडे पळ
ग्रामीण भागात वाढू लागली संख्या

रजनीकांत पाटील

अमलनरे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन आहे. संचारबंदी लागू करण्यात आल्याने शासकीय,खाजगी वाहन,रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तरी देखील गावाकडे बाहेरून गुजरात, मुंबई,पुणेकर यांच्यात होतेय वाढ.

ग्रामीण भागातील बरेच लोक गुजरात,मुंबई ,पुणे याठिकाणी नोकरीव्यवसाय करत असतात. कोरोनाला घाबरून अनेकांनी आपल्या गावाकडे खेड्यात आपला जीव धोक्यात घालून लुप्या छुप्या चोरट्या मार्गाने रात्री बेरात्री नागरिकांचा गावांत प्रवेश होत असल्याचे दिसत आहे.
या मुळे खेड्यातील लोक त्यांच्या कडे संशयास्पदनजरेने बघतात.
यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

या साठी पोलीस प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ग्रामीण जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रात्री बेरात्री चोरी छुप्या मार्गाने येणाऱ्यांना आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button