Chopda

आखाडा विधानसभेचा……. चोपडा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळावी या करिता सेवानिवृत्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक "शिवसेना भवनांवर"

आखाडा विधानसभेचा…….
चोपडा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळावी या करिता सेवानिवृत्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक “शिवसेना भवनांवर”

आखाडा विधानसभेचा....... चोपडा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळावी या करिता सेवानिवृत्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक "शिवसेना भवनांवर"

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
सध्या सर्वच राजकीय पक्षात भरती ओहटी सुरू आहे.त्याच धर्तीवर चोपडा विधानसभा मतदार संघासाठी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यकांत सूर्यवंशी यांनी शिवसेना भवनांवर आपली धाव घेतली आहे.चोपडा विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या वतीने इच्छुकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढत चालली आहे. एकंदरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना जळगाव महानगरपालिका घरकुल घोटाळा प्रकरणात धुळे न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने ही इच्छुकांची भाऊगर्दी अधिकच बळावली आहे.धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेचे स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन व सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांची सामाजिक कामे व लोकप्रियता बघता लोकांनी त्यांना चोपडा विधानसभा निवडणुकीत भाग घेण्याचा आग्रह केला आहे त्या अनुषंगाने त्यांना मुंबई शिवसेना कडुन मुलाखतीसाठी बोलविण्यात आले असून दिलीप सुर्यवंशी हे दादर येथील शिवसेना भवनात मुलाखतीसाठी दाखल झाले आहेत असे विश्वासनिय सूत्रांकडून समजते.

आखाडा विधानसभेचा....... चोपडा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळावी या करिता सेवानिवृत्त वरीष्ठ पोलिस निरीक्षक "शिवसेना भवनांवर"

त्यांनी धरलेल्या या शिवसेनेच्या वाटेमुळे चोपडा विधानसभा मतदारसंघात राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले असून स्थानिक पुढाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिलीप सूर्यकांत सूर्यवंशी यांचे मुळगाव जामनेर तालुक्यातील खातगाव असून त्यांनी मुंबई, नवी मुंबई, मुंब्रा,भिवंडी,ठाणे,कल्याण आदी ठिकाणी आपली सेवा बजावली असल्याने एक ‘सिंघम’ अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती त्यामुळे या प्रामाणिक अधिकाऱ्याला शिवसेनेत येण्याचा आग्रह होत आहे.त्यांनी यावल,जामनेर, चोपडा या मतदारसंघात अनेक सामाजिक, शैक्षणिक,वैद्यकीय, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले आहेत.आपल्या पत्नीच्या नावे स्व.अंजली दिलीप सूर्यवंशी फाउंडेशन स्थापन करून गीतांजली प्रतिष्ठान दुसखेडा ता.यावल द्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषाचे ज्ञान व्हावे म्हणून इंग्लिश मीडियम स्कूल,गरजूंना मोफत रुग्णवाहिका, स्कूल बस,मेडीटेशन हॉल,व्यायामशाळा, वाचनालय, पाणी टंचाई काळात मोफत टँकर पाणी पुरवठा, स्पर्धा परीक्षासाठी सुसज्ज वाचनालय असे कितीतरी प्रोजेक्ट उभारले आहेत.धानोरा आदिवासी आश्रम शाळेचे चेअरमन पद संभाळताच त्यांनी पालक सभेला महत्त्व देत आदिवासी भागातील पालकांना शिक्षण विषयी महत्त्व पटवून देण्यासाठी अग्रक्रम दिला आज त्या आदिवासी आश्रम शाळेतील मुले ही विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत यामुळेच चोपडा विधानसभा मतदारसंघात दिलीप सूर्यवंशी यांना उमेदवारी घेण्यासाठी आग्रह धरला जात आहे.थेट मुंबईहुन आलेल्या मुलाखतीचे आमंत्रण स्विकारत त्यांनी मुलाखत दिली असून त्यांना शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आ.नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतच थांबण्याचे संकेत दिल्याने त्यांना शिवसेनेकडून चोपडा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे यावेळी त्यांच्या सोबत काही सेना आमदार असल्याचे देखील सूत्रांकडून समजते.याच मुलाखतीसाठी डी. पी.साळुंखे सर,विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी सौ.लता सोनवणे, श्यामकांत सोनवणे, सौ.माधुरी पाटील हे देखील शिवसेना भवनात दाखल झाल्याचे समजते.मात्र शिवसेनेकडुन नवखा चेहरा देण्यात येईल हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे हे मात्र निश्चित!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button