नेरी येथे पक्षी घागर घरोघरी–::पर्यावरण संवर्धन समिती नेरी चा उपक्रम
लाँकडाउन मध्ये सोसियल डिस्टंस चा काटेकोर पालन
ज्ञानेश्वर जुमनाके
नेरी–::: उन्हाळा सुरू झाला असुन तापमानाचा पारा वाढला आहे. मानवाची पाण्यासाठी जशी भटकंती होत आहे. तशीच पक्ष्यांची पाण्यासाठी वनवन चालु आहे. पाण्याअभावी प़क्ष्यांचा मृत्यू होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. जंगलाची कटाई, झाडांची तोड, तापमानात वाढ, वनवा, मोबाइल चा अतिवापर, रासायनिक खते, यामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. पाण्यासाठी पक्ष्यांची दारोदारी भटकंती होत आहे. “” मला दारात पिण्यासाठी पाणी मिळेल का ❓””अशी पक्ष्यांची ओरड येत आहे.
कोरोनाने भारतात थैमान घातल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे शासनाने कडक पाऊल उचलत लाँकडाउन सुरू केले. लाँकडाउन मुळे पक्ष्यांची होरपळ होत आहे. लाँकडाउन मध्ये सोसियल डिस्टंस व मास्कचा वापर करून पक्षी जल पात्र उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पर्यावरण संवर्धन समिती नेरी चे अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, पिपलायन आष्टनकर, मंगेश वांढरे, सुदर्शन बावने,राहुल गहुकर, जयेश नन्नावरे आदी पर्यावरण संवर्धन समिती नेरी चे सदस्य उपस्थित होते.
कवडू लोहकरे यांचे मत
“” जनतेनी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. पाण्या अभावी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. प्रत्येकांनी आपल्या घरी पक्षी जल पात्र लावावे. “”
कवडू लोहकरे
पक्षी प्रेमी






