मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष निलेश बारी यांच्या नेतृत्वाखाली निखिल पाटील यांनी महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी संजय आर .धनगर यांना निवेदन देण्यात आले…
हेमकांत गायकवाड चोपडा
चोपडा : मा.अनिलभाऊ वानखेडे यांचे मार्गदर्शन व मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष निलेश बारी यांच्या नेतृत्वाखाली निखिल पाटील यांनी महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी संजय आर .धनगर यांना निवेदन देण्यात आले…
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २००० रुपये देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. जळगाव जिल्ह्यातील ६७५३ अंगणवाडी सेविकांना भाऊबीजेची भेट देण्यासाठी १.३५ कोटी एवढा निधी मंजूर असून त्यांना अजून प्राप्त झालेला नाही .शासनाने जाहीर केलेली भाऊबीज भेट न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांमधे नाराजीचा सूर असून उपरोक्त विषयानुसार २०००/- रुपये ची मदत तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावी या साठी निवेदन देण्यात आले .
सदर माहिती मनसे पदाधिकारी यांच्या कडून मिळाली..






