डोंजा येथील खैरी नदीतील सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांचे नवी दिल्ली येथे होणार सादरीकरण
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा सा.वा
ऐतिहासिक परंडा तालुक्यातील डोंजा येथे खैरी नदीपात्रात गाळ काढतांना सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांची इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज चे आजीव सदस्य अजय माळी हे नवी दिल्ली येथे ता. २१ मार्च २०२० रोजी सादरीकरण करणार आहेत.

डोंजा येथील खैरी नदीतील सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांचे फोटो व माहीती माळी यांनी इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज नवी दिल्ली येथे ई मेल व्दारे पाठवीली होती. त्याची दखल घेवून इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज नवि दिल्लीचे डायरेक्टर ऑफ चॅप्टर्स अरविंद शुक्ला यांनी अजय माळी यांना मोबाईल करून यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणार असल्याचे सांगीतले.तसेच डोंजा येथे सापडलेल्या अवशेषाचे फोटो व माहिती ” विरासत” या इंग्रजी व हिंदी तीमाही अंकात समावेश करणार असल्याचे सांगीतले. इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजचे विरासत हा इंग्रजी व हिंदी तीमाही अंक युनेस्कोसह १३० देशांत पाठविला जातो. त्यामुळे डोंजा गाव पुन्हा एकदा सर्व जगात प्रसिध्द होणार आहे. यापूर्वी डोंजा हे गाव भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनी दत्तक घेतल्यांनंतर प्रसिध्दीच्या झोतात आले होते.

इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही भारतातील एक अग्रगन्य संस्था असून जगातील एक मोठी संस्था म्हणूनही इंटॅकचा उल्लेख केला जातो. देशाच्या सांस्कृतिक व प्राकृतीक वारशांबाबत जागृती, नैसर्गीक संसाधने व संपत्ती, पारंपारीक कला शील्पांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन देऊन मदत करते. अजय माळी हे इंटॅकचे आजीव सभासद असून इंटॅकच्या पदसीध्द सदस्यांमध्ये भारत सरकारमधील संस्कृती मंत्रालयाचे सचिव, वन मंत्रालयाचे सचिव, नागरी विकास मंत्रालयाचे सचिव, नॅशनल म्युझीअमचे महासंचालक, भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक, भारतीय नेव्ही, भारतीय आर्मी तसेच तज्ञ संशोधकांचा समावेश आहे.
ऐतिहासिक परंडा तालुक्यातील डोंजा येथे खैरी नदीपात्रात गाळ काढतांना सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांमुळे जिल्हयास मोठी प्रसिध्दी मिळाली आहे.आता इंटॕक मुळे जगभरात प्रसिद्धी होणार आहे. जिल्हयाचा पर्यटनातुन आर्थीक विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रतिक्रिया –
अजय माळी यांनी डोंजा येथील खैरी नदीतील सापडलेल्या प्राचीन मंदिराच्या अवशेषांचे फोटो व माहीती इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजला ई मेल व्दारे पाठवीली आहेत. याबाबत इंटॅक पुढील मार्गदर्शन करणार आहे.
अरविंद शुक्ला , ग्रुप कॅप्टन इंडियन एअर फोर्स, रिटायर्ड
(डायरेक्टर ऑफ चॅप्टर्स इंडियन नॅशनल फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज नवी दिल्ली.






