Maharashtra

मूडी येथील धुळे पोलिस स्वप्निल चौधरी याने दाखविले माणुसकीचे दर्शन…

मूडी येथील धुळे पोलिस स्वप्निल चौधरी याने दाखविले माणुसकीचे दर्शन… सांगली कोल्हापुर पुर ग्रस्तांसाठी जमा केले चाळीस हजार रूपये…!

मूडी येथील धुळे पोलिस स्वप्निल चौधरी याने दाखविले माणुसकीचे दर्शन...

पोलिसांमध्ये माणुसकी नसते ते अतिशय कडक असतात अशी भावना समज आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो परंतु अतिशय कठीण जीवन जगणाऱ्या नव्हे खर तर ज्याला स्वतःच्या मर्जी प्रमाणे जीवन जगण्याचा हक्क च नाही असा दिवस रात्र कायदा आणि सुव्यवस्था यासाठी झटणाऱ्या पोलिसांच्या बद्दल आपल्या मनात राग असतो. त्यांनाही मन असते भावना असतात हे
मूडी येथील पोलिस जवान स्वप्निल प्रकाश चौधरी याने दाखवून दिले आहे. आपल्या राज्य राखीव बल धुळे तसेच बॅच 2017 व बाहेरील शाळा,कॉलेज गावकरी तसेच संपर्कात असलेला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मित्र परिवार बंधू भगिनी न कडून फोन पे ,गूगल पे च्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले व या आवाहना ला उदंड प्रतिसाद मिळाला.यात शक्ती प्रमाणे मित्र परिवाराने 50,100,200,500,1000 अशी मदत केली. असे दोन दिवसात चाळीस हजार रू. जमा केले. राज्यात कोल्हापुर सांगलीत पुराचे थैमान घातले आहे. आजवरचा इतिहासात इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती त्या भागाने कधी बघितली नव्हती महापुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत ,अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अन्न, वस्र, निवारा या मुलभुत गरजांसाठी देखील संघर्ष करावा लागतोय अशा बिकट अवस्थेत सापडलेल्या पुरग्रस्तांचे अश्रु पुसण्यासाठी मूडी येथील एस.आर.पी पोलिस स्वप्निल प्रकाश चौधरी याने आवाहन केले आणि त्या सादे ला त्याच्या मित्रांनी,सहकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. गरीबीची जाणीव असलेला स्वप्निल चौधरी याने आज उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले. या बद्दल स्वप्निल चे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.आणि खरोखर त्या पैशांचा उपयोग पुरग्रस्तांसाठी झाला पाहिजे म्हणून स्वतः अन्न पदार्थ कपड़े जीवनावश्यक वस्तु घेऊन  कोल्हापुर व सांगली रवाना होत आहे….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button