Amalner

अमळनेर :पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात 28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृती दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते.
अगोदर क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले तर उपाध्यक्ष डॉ माधुरी भांडारकर प्रतिमेला माल्यार्पण केले.
यावेळी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव पी.एन भादलीकर सानेगुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंग पवार व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सानेगुरुजी वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button