Pandharpur

पंढरपुरातील अंध वअपंगांना मनसेची मदत

पंढरपुरातील अंध वअपंगांना मनसेची मदत

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर तालुक्यातील दोन महिन्यापासून लॉक डाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनमुळे पंढरपूर शहरातील अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. शहरातील अनेक अपंग व दिव्यांगांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. छोटेा मोठे असे व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आहेत. परंतु सलग दोन महिन्याच्या लोकांमुळे अपंग व दिव्यांग लोकांच्या व्यवसायावर टाच आली आहे .

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पंढरपूर शहरातील अपंग व दिव्यांग लोकांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते अन्नधान्य सह जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. येथील नवजीवन अपंग शाळेत झालेल्या कार्यक्रमात पंढरपूर नगर पालिकेचे नगरसेवक अंबादास धोत्रे यांच्या उपस्थितीत मदतीचे वाटप केले. राज्यभरात कोरोनाचे संकट अधिकच घोंगावू लागले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. लोकांना घरीच थांबण्याचे आव्हान केले जात आहे. बाजार पेठा आणि हातावरचे व्यवसाय बंद असल्याने अशा अनेक अपंग व दिव्यांगाच्या समोर अनेक अडचणी आल्या आहेत .पंढरपूर शहरात अपंगाची संख्या मोठी आहे.

यामधील अनेक अपंगांना रोजगाराचे कोणतेही साधन नाही. परावलंबित्व असलेल्या शहरातील अनेक अपंगांना आज मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या हस्ते गहू , तांदूळ, साखर आदी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. अडचणीच्या काळात अपंगांना मनसेकडून मदत मिळाल्याने अपंगांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लाॅकडाऊन काळात शहरातील अशा पंखांना दानशूर लोकांनी मदत करावी असे आव्हान श्री धोत्रे यांनी केले आहे.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष सिद्धेश्वर गरड उपप्रमुख महेश पवार अर्जुन जाधव सागर घोडके समाज कल्याण विभागाचे सूर्यकांत भगत सुधीर कड्डी मोहन थोरात अजित माने नितीन कटप , अण्णा जाधव आधी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button