गोल्डन अपाॅरच्युनिटीज आयोजित ऑनलाईन “युवा वक्ता महाराष्ट्राचा” या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रतिनिधी रफीक आत्तार
गोल्डन अपाॅरच्युनिटी आयोजित श्री नरेंद्र लक्ष्मण लोहार व सौ.यामिनी लोहार यांनी ऑनलाइन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.
“युवा वक्ता महाराष्ट्राचा” यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास ५० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षण श्री जितेन्द्र लुळे.नंदुरबार (शिक्षिक) यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुदाम लगड, राजेंद्र वनराज लोहार, फिरोज शेख, हेमराज यमाजी वाघ, लोमेश वनराज लोहार, ईश्वर रामदास महाजन, पंकज नाले,पार्थ भेंडेकर यांचे सहकार्य लाभले.त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी वनराज लिलाधर लोहार, लक्ष्मण चांगो लोहार, मनोज चव्हाण, मनोज भावलाल लोहार, राकेश लोहार आणि संपूर्ण मित्र परिवाराकडून शुभेच्छा मिळाल्या.
या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नांदेड, पुणे, अमरावती, सांगली, चंद्रपूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, औरंगाबाद, सुरत, रायपूर, सोलापूर, बीड येथून स्पर्धक सहभागी होते. यामध्ये लहान गट- कु.संजीवन श्यामसिंग सोलंकी, जळगाव.प्रथम , शेख अफशा शेख फारुख द्वितीय आणि कु आकांक्षा राजेश गायकवाड,नायडोंगरी,तृतीय क्रमांक.तसेच वैष्णवी नामदेव माने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला तर मोठ्या गटातून -कु.सिद्धी मयुरी महादेव घाडगे प्रथम क्रमांक,कु सृष्टी राजकुमार पाटील द्वितीय क्रमांक,कु.रेणुका विनोद धुमाळ तृतीय क्रमांक तसेच कु.ऋतुजा राजेश गायकवाड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.
खुला गट- कु.हरीश महावीर प्रजापती उत्तेजनार्थ क्रमांक,कु.बालाजी आनंद वरवटे उत्तेजनार्थ क्रमांक,रिया रुपेश पवार उत्तेजनार्थ क्रमांक,कु.विक्रांत वसंत टेरवकर, उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला सर्वांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले.सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच नरेंद्र लोहार ,यामिनी लोहार तसेच गोल्डन अपाॅरच्युनिटीजच्या टिम ने सर्व लहान-मोठ्या वक्ते यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






