खामखेडा सोसायटीच्या चेअरमनपदी अभिमन शेवाळे तर व्हा-चेअरमन उषाताई बोरसे यांची बिनविरोध निवड
महेश शिरोरे
देवळा तालुक्यातील खामखेड़ा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अभिमन रामभाऊ शेवाळे तर व्हा-चेअरमन पदी उषाताई शिवाजी बोरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खामखेड़ा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन धनराज शेवाळे व व्हा- चेअरमन हौसिंग मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाल्येल्या जागेवर चेअरमन व व्हा-चेअरमन जागेसाठी देवळा तालुक्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी सतिष देवघरे यांनी देवळा येथील शासकीय इमारतीत साहयक निर्बंधक कार्यलयात सर्व संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात येऊन चेअरमन व व्हा- चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी अभिमन शेवाळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात येऊन .त्यास सूचक समाधान आहेर तर अनुमोदक म्हणून धनराज शेवाळे होते.तर व्हा- चेअरमनपदासाठी उषाताई बोरसे यांचा एकमेव अर्ज दाखल दाखल करण्यात येऊन त्यास सूचक म्हणून भाऊसाहेब सोनवणे तर अनुमोदक म्हणून अलका शेवाळे यांनी दिले.निर्धारित वेळेत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने चेअरमन म्हणून अभिमन रामभाऊ शेवाळे तर व्हा चेअरमन म्हणून सौ उषाताई शिवाजी बोरसे यांची निवडणूक अधिकारी देवळ्याचे अद्यासी अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक सतिष देवघरे यांनी बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केले. बिनविरोध निवड जाहीर होताच कार्यक्रत्यानी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. निवडणूक अधिकारी म्हणून देवळाचे सहाय्यक निवडणूक अध्यासी अधिकारी तथा वरिष्ठ लिपिक सतिष देवघरे यांनी काम पाहिले. तर त्यांना सहायक अधिकारी म्हणून सचिव कैलास बच्छाव यांनी मदत केली.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा चेअरमन यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटिल, सरपंच संजय मोरे, माजी सरपंच संतोष भाऊ मोरे, दादाजी बोरसे,सोसायटीचे माजी चेअरमन नानाजी मोरे, सुनिल शेवाळे, समाधान आहेर,, विश्वास शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे,दौलत बोरसे,भाऊसाहेब सोनवणे,,अभिमन शेवाळे, उषा बोरसे,अलका शेवाळे, रयत क्रांतीचे रविंद्र शेवाळे , शिवसेनेचे प्रशांत शेवाळे, मंगेश शेवाळे ,संजय शेवाळे, गोरख महाराज शेवाळे, जगन्नाथ शेवाळे, शिवाजी बोरसे, भाऊसाहेब बोरसे, आदि उपस्थित होते.






