Chandwad

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात परिचरिकांचा सन्मान

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात परिचरिकांचा सन्मान
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : चांदवड शहरात असलेले उपजिल्हा रुग्णालय गेले काही दिवसपासून काही न काही घटनांनी चर्चेत आहे.काल 12 मे जागतिक परिचारिका दिन म्हणजेच फ्लोरेन्स नाईटइंगल यांचा जन्मदिन.याच दिनाचे औचित्य साधून चांदवड मधील सामाजिक कार्यकर्ते यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन तेथील परिचरिकांचा पुष्प देऊन सन्मान केला.
यावेळी ब्लु पँथरच्या पांडुरंग भडांगे यांनी सांगितले की
आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यासाठी सर्व मित्र परिवार उपस्थित होता परिचारिका दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील समस्त परिचारिका आज जी काही मेहनत घेत आहेत त्या मेहनतीला सर्वांचा सलाम या दिनानिमित्त सर्व परिचारिकांना येणाऱ्या अडचणीत सहकार्य करण्याचे वचन देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवत त्यांचे आभार व्यक्त केले
याप्रसंगी दत्तात्रय(आबा)गांगुर्डे, संदीपशेठ उगले,दीपक शिरसाठ,डॉ पालवे,डॉ राजपूत,समाधान जाधव यासह परिचारिका उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button