Amalner

अमळनेर: एसटी संप..! प्रशासनाची दादागिरी..!अजून एका बस चालकास हृदयविकाराचा झटका..!

एसटी प्रशासनाने दादागिरी थांबवावी! अजून एका बस चालकास हृदयविकाराचा झटका..!

अमळनेर आगारातील चालक प्रवीण पाटील यांना मंगळवारी आगार परिसरातच हृदयविकाराचा झटका आला होता. ही घटना ताजी असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू असतानाच पुन्हा एका चालकाला अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलेले आहे. दीपक हिरामण पाटील असे या पीडित कर्मचार्‍याचे नाव आहे. विलिनीकरणासाठीचा संप मोडीत काढण्यासाठी कर्मचार्‍यांवर जी जोरजबरदस्ती केली जात आहे त्याचाच हा परिपाक असून एसटी महामंडळाच्या प्रशासनाने ही दादागिरी थाबंवावी अन्यथा एखाद कर्मचार्‍याला जिवाशी मुकावे लागेल अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

गेल्या ता. 28 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप कर्मचारी संघटना आणि शासनामध्ये तोडगा निघाला नसल्याने अद्यापही सुरुच आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी साम, दाम, दंड व भेद या नितीचा अवलंब राज्य सरकारकडून केला जात आहे. एकीकडे नोकरी गमाविण्याची भिती तर दुारीकडे संघटनेचा दबाव यामुळे कर्मचारीवर्ग कात्रीत सापडला असून प्रचंड मानिसक ताणतणावाखाली आहे. संपावर असल्याने काहींना निलंबित केलेले आहे. त्यांना हेअरिंग व स्वाक्षरीसाठी जळगाव येथे जावे लागते. तेथे कॅबिनमध्ये कर्मचार्‍यांना थेट सेवासमाप्तीचीच ऑर्डर हातात टेकवली जाते. यामुुळे गर्भगळीत झालेला कर्मचारी भविष्याची चिंता करतो व घाबरून कामावर येतो म्हणून अर्ज दाखल करतो. जळगावहून अमळनेर आगारात संबंधित कर्मचारी दाखल झाला की त्याला बस फेरी मारण्याबाबत आदेशित केले जाते. पोलीस संरक्षणही दिले जाते. मात्र, तरीही संपकरी सहकार्‍यांचा रोष त्यांना पत्कारावाच लागतो. गद्दार म्हणून अशा पर्याय खुंटलेल्या कर्मचार्‍यांची निर्भत्सना केली जाते.
अत्यावस्थ चालक दीपक हिरामण पाटील यांना बस आगार परिसरातच अस्वस्थ वाटू लागले. त्यांना काहीएक सूचत नसल्याने ते रडायला लागले. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने 108 रूग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. त्यांना तात्काळ उपचारार्थ शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, जोरजबरदस्तीची चांगलीच धास्ती कर्मचार्‍यांनी घेतलेली असून एसटी महामंडळाच्या प्रशासनाने दादागिरी थांबवावी, बस फेरी मारण्याची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी जोर धरून आहे.
धास्तावलेल्या कर्मचार्‍यांचे कुटुंबिय मैदानात; जोरजबरदस्तीविरूद्ध एल्गार!
प्रविण पाटील या चालकाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास व्यवस्थापनाने बस दिली नाही, तसेच तातडीची मदत न केल्यामुळे पाटील यांचे कुटुंबिय नाराज होते. बुधवारी बसचालक पाटील यांच्या पत्नीने आक्रमक भूमिका घेतली. पती बरा होईपर्यंत एकही बस आगारातून बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आगारातून बुधवारी केवळ पारोळा मार्गावर बस रवाना झाली. तिच्यावरही दगडफेक झाल्याची घटना घडली. तसेच विभाग नियंत्रकांना भ्रमणध्वनी वरून कामगारांना सक्ती करू नका, चालक प्रवीण पाटील यांना तातडीची मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button