शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करावा म्हणून भारत राष्ट्र समीतीचे तहसीलदारांना साकडे ?
सुनिल नजन
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या जळालेल्या पिकांचे सरसगट पंचनामे करावेत अशा ११ मागण्याचे भारत राष्ट्र समितीच्या वतीने निवेदन देउन तहसीलदारांना साकडे घातले आहे. सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला पाहिजे.कांदा निर्यातीसाठी लागणारे निर्यात शुल्क रद्द करावे.दुधाच्या दरात वाढ करावी.मागिल वर्षी अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे.शेतकऱ्यांचे कर्जे आणि विजबीले माफ करावी.विद्यार्थी वर्गाची शैक्षणिक फी माफ करावी. दुष्काळ ग्रस्त गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा.पि.एम किसान आणि नमो सन्मान योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत. टंचाई ग्रस्त गावात जनावरांच्या दावणीवर चारा उपलब्ध करून द्यावा अशा आशयाच्या मागण्याचे निवेदन शेवगाव-पाथर्डी च्या तहसीलदारांना देण्यात आले आहे. त्या निवेदनावर शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे मुख्य समन्वयक संदिप राजळे,पप्पू केदार, बाळासाहेब साळवे, क्रुष्णा पांचाळ, आदिनाथ बटुळे,प्रकाश मगर यांच्या सह्या आहेत.






