Amalner

स्टेट बँक खातेधारकांची तप्त ऊन्हात दमछाक , ससेहोलपट व लाही लाही… तर बँक व्यवस्थापकांना ए.सी.चा गारवा..वारेवा लोकशाही……

संदीप सैंदाणे

अमळनेर – स्टेट बँक खातेधारकांची तप्त ऊन्हात दमछाक , ससेहोलपट व लाही लाही… तर बँक व्यवस्थापकांना ए.सी.चा गारवा..वारेवा लोकशाही……

अमळनेर स्टेट बँक शाखेमध्ये पैसे काढनारे खातेदार वरिष्ट नागरिकांना व गिऱ्हाईकांना अंत्यंत गैरसोईना तोंड द्यावे लागत आहे.दोन दोन तास कळक उन्हामध्ये ऊभे रहावे लागत आहे.४१ डीग्री सेल्सीयस च्या तप्त उन्हात जीवाची अक्षरश: लाही होते आहे अशे खातेदारांनी व वरीष्ठ नागरीकांनी आमच्या प्रतिनिधीकडे भावना व्यक्त करतांना सांगितले.

त्याच्या डोक्यावर काहीतरी सावलीची व्यवस्था करावी किंवा अंतराने बँकेत पाच पाच लोकांना प्रवेश द्यावा वरिष्ठाना वेगळी सोय करावी.कर्मचारी,व्यवस्थापक समिती जशे गार हवेत असतात त्याच प्रकारे खातेदारांकडे मानवतेच्या दृष्टिने बघावे व त्यांना किमान सावलीची सोय करावी असी मागणी होत आहे.कारण भारत देश लोकशाहीवर चालतो येथे लोकांची सोय केंद्रस्थानी मानावी त्यांना पशुसारखी वागणुक देऊ नका .खातेदारांंवर बँक चालते हे विसरू नका ते अपलेच देशवासी आहेत त्याची आबाळ होणार नाही याची स्टेट बँक शाखा अमळनेर यानी दक्षता घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button