Kolhapur

?️ Big Breaking…इचलकंरजीत खंडणीस नकार दिल्याने युवकावर खुनी हल्ला आठ जणांवर गून्हा दाखल

इचलकंरजीत खंडणीस नकार दिल्याने युवकावर खुनी हल्ला

आठ जणांवर गून्हा दाखल

कोल्हापूरःआनिल पाटील

वीस हजारांची खंडणी देण्यास नकार दिल्याने भरवस्तीत युवकावर थरारक पाठलाग करत सिने स्टाईलने खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार आसरानगर परिसरात भररस्त्यात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अनिल चंद्रकांत काजवे (वय ३१) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव असून एका घराचा आसरा घेतल्याने तो सुदैवाने बचावला. हल्लेखोरांनी काजवे याच्या मोटारसायकलचीही मोडतोड करत एका घरावर दगडफेकही केली. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी रेकॉर्डवरील चौघांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरा एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

याप्रकरणी गावभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनिल काजवे हा आसरानगर परिसरात राहत असून वडगाव बाजार समिती येथे दिवाणजी म्हणून काम करतो. गेल्या आठवड्यात नंदनवाडे याने न्यायालयीन कामासाठी २० हजारांची खंडणी काजवे याच्याकडे मागितली होती. मात्र पैसे देण्यास काजवे याने नकार दिला. त्यावेळी, तुला जिवंत रहायचे असेल, तर पैसे द्यावे लागतील, अशी धमकी नंदनवाडे याने दिली. आज दुपारी काजवे हा मथुरानगर परिसरात आपली मोटारसायकल(बुलेट) घेऊन मालकाची प्रतीक्षा करीत थांबला होता. यावेळी नंदनवाडे व राजन्नावर या दोघा संशयितांनी पुन्हा खंडणीची मागणी केली. यावेळी त्यांना टाळत आपली मोटारसायकल तेथेच ठेवून काजवे निघून गेला.

त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास तो परतला असता त्यांच्या मोटारसायकलची हत्त्याराने मोडतोड केल्याचे दिसून आले. तिथून काजवे हा घरी जाण्यासाठी आसरानगर परिसरात आला असता नंदनवाडे, राजन्नावर, बाबर व केसरे या चौघांसह अन्य अनोळखी चौघांनी त्याच्यावर मोठे कोयते व मागाचा मारा घेवून हल्ला केला. या संशयितांनी काजवे याचा भरस्त्यात मोटरसायकलवरून पाठलाग केला. त्यावेळी नंदनवाडे याने काजवेवर कोयत्याने वार केला. मात्र तो चुकवून काजवे याने जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्यानंतर काजवे याने आपला जीव वाचवण्यासाठी आसरानगर गल्ली क्र.५ मध्ये दिनेश भास्कर पवार यांच्या घरात आसरा घेतला. तेथून त्याने पाठीमागील दरवाज्याने इतर दोन घरांवर उड्या मारून पलायन केले. त्यामुळे तो बचावला. मात्र हल्लेखोरांनी भास्कर पोवार यांच्या घरावर दगडफेक केली तसेच कोयता, फरशा आदींच्या सहाय्याने दरवाजाही तोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबाबतची काजवे याने गावभाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार महादेव नंदनवाडे, असिफ राजन्नावर, अभिजीत बाबर व राहूल केसरे (चौघे रा.आसरानगर परिसर) या चौघांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर घटनास्थळी उपअधीक्षक गणेश बिरादार व सपोनि गजेंद्र लोहार यांनी भेट दिली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button