Maharashtra

बारामतीत राबवणार भिलवाडा पॅटर्न

बारामतीत राबवणार भिलवाडा पॅटर्न

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती- बारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संकेत दिले आहेत.बारामतीमध्ये आत्ता कोरोनाबधित रुग्णाची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे सूतोवाच केले.बारामतीत कोरोनाबधित रुग्णाची संख्या सहावर पोहचली आहे त्यामूळे बारामती प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावीत असे आदेश दिले आहेत.तसेच बारामतीतील प्रत्येक घरात जाऊन त्याठिकाणी असणारे सर्दी,खोकला व तापाचे रुग्णाला त्वरित उपचार करणे व त्याला तपासणी करणे आदी गोष्टीची माहिती संकलित करण्याचे काम बारामती प्रशासनाने करावे असे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत.

काय आहे भिलवाडा ‘पॅटर्न’

राज्यस्थानातील भिलवाडा हे ठिकाण पूर्णत्व लॉकडाऊन आहे.त्याठिकाणी कोरोना आजारावर पुर्णतः नियंत्रण मिळवले आहे.कोणीही घराबाहेर पडत नाही.अशी भिलवाडा योजना बारामतीत सुरु करण्याचे सूतोवाच केले आहे.
बारामतीतील जनतेने अनावश्यक बाहेर जाण्याचे टाळावे.बाहेर गेल्यास मास्कचा वापर करावा, गर्दी कोणीही करू नये. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीकराना केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button