Rawer

? Crime Diary..वृद्ध शेतकऱ्याने संतापाच्या भरात ६६ वर्षीय पत्नीच्या गळ्यावर विळ्याने गळ्यावर वार करून केले ठार

वृद्ध शेतकऱ्याने संतापाच्या भरात ६६ वर्षीय पत्नीच्या गळ्यावर विळ्याने गळ्यावर वार करून केले ठार

रावेर प्रतिनिधी

युसुफ शाह

तालुक्यातील नेहता गावातील वृद्ध शेतकऱ्याने संतापाच्या भरात ६६ वर्षीय पत्नीच्या गळ्यावर विळ्याने गळ्यावर वार करून तिला ठार मारले आणि स्वतः आपल्या घरात दोरीच्या सहाय्यने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पहाटे समजली.रावेर तालुक्यातील नेहता येथील रहिवासी फकीरा तुकाराम वैदकर वय ७३ पत्नी कमलाबाई वैदकर वय ६६ दोघेही गावातील दोधे रोडवरील समाज मंदिरामागे असलेल्या नवीन प्लॉट्स भागातील रहिवाशी होते. फकीरा वैदकर यांच्या स्वभाव तापट असल्याने त्यांचे दोघ मुलांशीही जमत नव्हते. दोन्ही मुले गावातच वेगळे राहत होते. फकीरा वैदकर यांचे व पत्नीचे नेहमी भांडण होत असत ते नेहमीच पत्नीलाही मारण्याची भाषा करीत असल्याचे समजले.त्यांची नात हर्षाली ही सकाळी घरी दूध घेऊन आली असता त्याले ही घटना समजली. वृद्ध हे पत्नीशी नेहमीच स्वयंपाकावरून वा या ना त्या कारणाने हुज्जत घालून संतापात बख्खीने छाटून टाकण्याची धमकी देत होते. अखेर त्या संतापाचे पर्यावसान आज पत्नीचा खून करून स्वत: फकीरा यांनी शेजारच्या खोलीत जाऊन गळफास घेत स्वतःही आत्महत्या केली.इन्क्वेस्ट पंचनामा करून त्यांचे दोन्ही मुले रवींद्र व गणेश वैदकर यांच्या जाबजबाबातून फिर्याद घेण्याचे काम सुरू आहे. नेहता येथील सरपंच महेंद्र पाटील, पोलीस पाटील सरला कचरे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावरून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोज वाघमारे घटनास्थळावर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button