Paranda

जागतिक निसर्ग संवर्धन दिवसानिमित्त प्रतिष्ठाण कडून वृक्षांचे संगोपन

जागतिक निसर्ग संवर्धन दिवसानिमित्त प्रतिष्ठाण कडून वृक्षांचे संगोपन

प्रतिनिधी सुरेश बागडे

२८ जुलै हा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवसाचे अवचित्य साधून

नेहरू युवा केंद्र धाराशिव (भारत सरकार) संलग्नित श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच जागतिक निसर्ग संवर्धन दिवसानिमित्त २० झाडांची छाटणी, झाडांच्या बुडालाखाली खादनी करून झाडाजवळील गवत काढून झाडांचे संगोपन करण्यात आले. तसेच ५ नवीन रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. झाडांचे व सजीवांचे अतित्व अबाधित ठेण्यासाठी झाडांचे संगोपन व संरक्षण करावे असे श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक महादेव पाटील यांनी सांगितले.

या वेळी नेहरू युवा केंद्र धाराशिव (भारत सरकार) परंडा तालुका समन्वयक रणजीत पाटील,
समाधान मसगुडे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button