Amalner

तुतारी-ढोल ताश्यांच्या गजरात लोक संस्कृती व साहित्याचा जागर करीत ग्रंथदिंडी ने वेधले लक्ष

तुतारी-ढोल ताश्यांच्या गजरात लोक संस्कृती व साहित्याचा जागर करीत ग्रंथदिंडी ने वेधले लक्ष

अमळनेर( ) विविध लोकसंस्कृती चा जागर करीत पु सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय येथून तुतारी-ढोल ताश्यांच्या गजरात लोक संस्कृती व साहित्याचा जागर करीत अमळनेर शहरातून निघालेल्या लक्षवेधी ग्रंथदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत ,पू. साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय आयोजित विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथ दिंडी साहित्य चळवळीतील मान्यवर संमेलनाध्यक्ष अशोक कोळी,स्वागताध्यक्ष दिलीप सोनवणे व सौ ज्योतिर्मयी सोनवणे,अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील ,राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी रमेश पवार, सदस्य अशोक सोनावणे, तहसीलदार आबा महाजन, ग्रंथालय सचिव प्रकाश वाघ आदिंनी ग्रंथ ठेवलेल्या पालखीला उचलून ग्रंथदिंडी चा शुभारंभ केला.
याप्रसंगी सानेगुरुजी ग्रंथालयाचे उपाध्यक्षा सौ माधुरी भांडारकर, प्रा.डॉ.प्र. ज.जोशी, नगिन लोढा, सुमित धाडकर, ईश्वर महाजन , रणजित शिंदे , दिपक वाल्हे, निलेश पाटील, चंद्रकांत नगावकर, दिनेश नाईक,विजया गायकवाड, सौ.वसुंधरा लांडगे,भीमराव जाधव,अनिल घासकडवी,पी एन भादलीकर, ऍड.रामकृष्ण उपासणी, प्रसाद जोशी, डॉ.राजेंद्र पिंगळे, हेमंत भांडारकर,उमेश काटे, ऍड तिलोत्तमा पाटील,रुपाली पाटील,शैलजा माहेश्वरी आदिं मान्यवरांचीची प्रमुख उपस्थिती याप्रसंगी होते.
ग्रंथ दिंडीत पारंपारिक वेशभूषेत चालणारा पोतराज, तुतारी वाजवणारे मावळे,अश्वारूढ फेटा बांधलेल्या सुकन्या, डोक्यावर कळस घेऊन चालणाऱ्या मुली, टाळ वाजवणारे बाल वारकरी, भजनी मंडळ, सजवलेल्या वाहनावर जात्या वर ओवी गाणाऱ्या कवियत्री बहिणाबाई यांचा देखावा तसेच विविध पुस्तकांची, साहित्यिकांची नावे ,प्रतिमा असलेले फलक हाथी घेतलेले मुले, ढोल ताशे वाजवणारे वादक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
विभागीय खान्देशी बोली मराठी साहित्य संमेलनाचे या ग्रंथ दिंडीच्या केंद्रस्थानी असलेल्या पालखीत ठेवलेले भारताचे संविधान, तुकाराम गाथा, शेतकऱ्यांचा आसूड, दासबोध, लीळाचरित्र आदि ग्रंथ लक्ष वेधत होते. तर ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले विविध बोली भाषाचे नामफलक जसे ठाकरी,लेवा पाटीदारी,पावरी,वारली,तिरोली, मालवणी, भिल्ली,बागलानी,डांगी,वंजारी लक्षवेधी व मोठ्या उत्साहात विविध बोलीभाषांचा जागर करीत होते.
पू. सानेगुरुजी ग्रंथालयापासून निघालेली ग्रंथदिंडी पचपाऊली देवी मंदिर, बसस्टँड, धुळे रोड, विश्राम गृह, कोर्ट रोड, स्टेशन रोड मार्गे छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे समारोप झाला. या ग्रंथ दिंडीत शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे,भगिनी मंडळ विद्यालय, पू.सानेगुरुजी कन्या स्कुल, सानेगुरुजी माध्यमिक विद्यालय, जी एस हायस्कूल, द्रो. रा. कन्या हायस्कुल, लोकमान्य विद्यालय, विजय नाना आर्मी स्कुल, ज्ञानेश्वर पाठशाळा,सरस्वती विद्या मंदिर आदि शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी उत्साहात सहभागी झालेले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button