Pandharpur

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी ॠषिकेश राजेंद्र घाटे यांची निवड

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी ॠषिकेश राजेंद्र घाटे यांची निवड

प्रतिनिधी रफिक आत्तार

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची आज उत्तर सोलापूर येथील अकोलेकाटी येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील व उत्तर तालुक्यातील महिला, युवती ,युवक, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे, यांच्या अध्यक्षतेखाली आपण जनसामान्यांचे,अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर, विद्यार्थी व विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे म्हणाले यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान संघटनेच्या उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी ॠषिकेश राजेंद्र घाटे यांची एकमतानी निवड करण्यात आली.यावेळी निवडचे पत्र देताना शिवबुध्दचे सोलापूर विभागीय जिल्हाध्यक्ष विजयकुमार साठे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शैलेश साठे, युवासेनेचे अध्यक्ष अजिक्याराणा देशमुख,यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी गणेश पवार,भैय्या पतंगराव, औकार लामकाने, भगवंत लामकाने, समाधान साठे,अविनाश साठे, ॠषी काळे,बालाजी साठे,निखिल दुर्लेकर,
अंकुश देवकुळे, रामा जाधव,प्रतीक माने, सचिन पवार, मेहबूब पठाण, संग्राम बागल,इत्यादी उपस्थित होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button