नवरात्री उत्सवात कळसूबाई मंदिर भाविकांसाठी बंद – श्री कळसुबाई निवासिनी देवस्थान ट्रस्ट, बारी
भंडारदरा विठ्ठल खाडे
बारी – कोरोना महामारी संकटामुळे गेल्या मार्च २०२० महिन्यापासून देशातील महारष्ट्रातील – पर्यटन स्थळे , मंदिर शाळा सामाजिक कार्यक्रम , लग्न समारंभ अनेक कार्यक्रम बंद आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर पर्यटनासाठी बंद आहे.दुर्गम भागातील आदिवासी लोकवस्ती असलेले बारी गाव शिखर पायथ्याशी आहे. गावात प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध नाही.
संसर्ग सतर्कता म्हणून पर्यटनास बंदी आहे. आत्तापर्यंत गवकरी व सर्व नागरिक सुरक्षित आहेत. गाव , नागरिक सुरक्षित राहण्यासाठी कोरोना महामारी परिस्थिती पूर्व पदावर येईपर्यंत इथे येणाऱ्या पर्यटकास, भाविकास बंदी करण्यात येत आहे. दरवर्षी येणाऱ्या नवरात्र उत्सवात सर्वात जास्त गर्दी असते. लाखो भाविक येत असतात. गर्दी होऊन कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून देवस्थान समितीने या वर्षी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पांजरे इंदोरे पेंडशेत या मार्गाने येणाऱ्या सर्वांस भाविकांसाठी बंदी करण्यात येत आहे.
पर्यटक व भाविकमंदिर परिसरात ,शिखर परिसरात आढळल्यास उचित व कडक कार्यवाही करण्यात येईल. दंड वासुल करण्यात येईल. पर्यटकांनी ,भाविकांनी सहकार्याची भूमिका ठेऊन सहकार्य करावे. देवस्थानचे परवानगी शिवाय शिखर परिसरात प्रवेश करू नये.
मंदिर व मंदिर परिसरात देवस्थान समितीचे विना परवानगी कोणतेही अनुचित काम करू नये केल्यास योग्य दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल देवस्थान विश्वस्थ मंडळास सहकार्य करा. सुरक्षित राहा घरी रहा.- अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव श्री कळसुबाई निवासिनी देवस्थान ट्रस्ट, बारी व सरपंच बारी ग्रामपंचायत


