सुरगाणा शहरात रस्त्याच्या कामाच्या मंजुरी पासून ते उदघाटन पर्यंत सुरगाणा शहरातील नागरिकांनी नाट्यमय घडामोडी
सुरगाणा शहरात रस्त्याच्या कामाच्या मंजुरी पासून ते उदघाटन पर्यंत सुरगाणा शहरातील नागरिकांनी नाट्यमय घडामोडी बघितल्या पण साठे लोटे करून कामांना सुरवात झाली काम चालू झाले.
प्रतिनिधी विजय कानडे
मनमानी रस्त्याचे कामें झाली तसेच काही रस्ते अर्धवटच सोडून दिले ठेकेदार यांनी कारण पण असे सांगितले की हसू येते जर इस्टीमेट नुसार जर काम झाले नाहीतर बिले दिली कसं काय यात मोठा भ्रष्ट्राचार आहे तसेच मा खासदार हरीचंद्र चव्हाण यांनी सुद्धा या रस्त्यांची तक्रार जिल्हाअधिकारी याना केली नंतर समिती आली पुढे काय झाले?म्हणून कॉम्रेड राहुल आहेर यांनी आज जिल्हाअधिकारी कार्यलयायत लेखी स्वरूपात तक्रार केली त्यामध्ये त्यानी असे नमूद केले की सुरगाणा नगरपंचायत हद्दीतील झेंडा चौक ते मेनरोड रस्त्याच्या कोक्रेटि करण आणि भुयारी गटार या कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार झालेला आहे.
तसेच काम हे निवेदा प्रमाणे झालेले नाही तसेच रस्ताच्या दोन्ही बाजूच्या भुयारी गटरासाठी पाईप हे हलक्या प्रतीचे आहे तसेच रस्त्याच्या काम चालू असताना त्यांना ही बाब लक्षात आणून दिली तेव्हा ठेकेदार इस्टमेंट नुसार काम करू राहिलो आशी उडवा उडविची उत्तर दिले तसेच खोदकाम केले नाही त्यामुळे पण रस्त्याची उंची वाढली त्यामुळे दुकाने, घरे खड्यात गेले त्यामुळे या कोरोना काळात बांधकाम करणे शक्य नाही सर दुकानात पाणी शिरत आहे तरी कॉलिटी कॅट्रोल कडून चौकशी होऊन न होता आपल्या स्तरावरून समिती नेमून चोकशी व्हावी त्यामुळे तक्रार दारास न्याय मिळेल तसेच ऑनलाइन टेंडर असून सुध्दा एकाच ठेकेदार का काम मिळतात हा पण एक प्रश्न आहे तसेच या बाबीची लेखी स्वरूपात लेखी भारती ताई पवार(खासदार दिंडोरी लोकसभा )याना देण्यात आली आणि त्यांनी आश्वासन दिले कामाची चौकशी करून जर कामात जर भ्रष्ट्राचार झालेला असेल आणि जे जबाबदार असेल त्यांनच्या वर कार्यवाही करण्यात येईल ठेकेदार काळ्या यादी टाकण्यात येईल.
सुरगाणा शहरातील नगरपंचायतमधील रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, कॉम्रेड राहुल आहेर यांची जिल्हाअधिकारी आणि भारती ताई पवार (खासदार दिंडोरी लोकसभा)यांच्या कडे लेखी मागणी अन्यथा उपोषण करण्यात येईल.






