Maharashtra

आरोग्याचा मुलमंत्र… डाळिंबा चे आरोग्यास फायदे

आरोग्याचा मुलमंत्र..डाळिंबा चे आरोग्यास फायदे

भारतात डाळिंबाचे पीक सर्वत्र घेतले जाते. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. डाळिंब मूळचे इराण व आफगाणिस्तानाकडील फळ आहे. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे डाळिंबाचं पिक घेतलं जातं. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.

– शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.

– हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

– डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.

– घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या .

– यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी

– मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.

– ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.

– डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.

– अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.

– जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.

– डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.

– बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.

– चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.

– अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.

पण डाळिंब सोलल्या नंतर लगेच खावे, अन्यथा त्यातील औषधी गुण लोप पावतात.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
होमिओपॅथी तज्ञ

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button