Mumbai

आजच्या विद्यार्थीनिनी स्वयंम प्रकाशित झाले पाहिजे! – अॅड. प्रज्ञेश सोनावणे

आजच्या विद्यार्थीनिनी स्वयंम प्रकाशित झाले पाहिजे! – अॅड. प्रज्ञेश सोनावणे

शहापूर प्रतिनिधी
मिलिंद जाधव

शहापूर तालुक्यातील चांग्याचा पाडा, दामोदर शिवराम विशे आदिवासी (कातकरी) मुलींचे शैक्षणिक संकुल येथे दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता सामाजिक अाशयाचे पुस्तकांचे वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

भारतीय संविधानाने प्रत्येक पुरुषांप्रमाणे, स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने स्त्रियांनी मोठी भरारी घेतलेली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, राजकीय, आर्थिक इत्यादी क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविले आहे. परंतु ग्रामीण भागात मुलींचे कमी वयात लग्न लावून दिले जाते, त्यामुळे त्या मुलींचे स्वप्ने भंगविली जातात, त्यांना पुढे शिकण्याची ईच्छा असली तरी त्या शिकू शकत नाही.अशी खंत सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी व्यक्त केली. प्रत्येक मुलींनी स्वतःला कमी न समजता, सकारात्मक विचार केला पाहिजे. कमी गुण मिळाले म्हणून निराश न होता, अजून जोमाने अभ्यास करण्याची गरज आहे. आपले विचार आचार शुद्ध असले पाहिजे. तरच आपली, आपल्या घराची, आणि समाजाची प्रगती होते. असे ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी बोलतांना सांगितले. तर शाळेतील १००विद्यार्थ्यांनीना, पेन,पेन्सिल,रबर देऊन सामाजिक आशयाचे २५ पुस्तके शाळेच्या वाचनालयाला अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांच्या कडून भेट देण्यात आले.

यावेळी युवा कवी मिलिंद जाधव यांनी ”साक्षर करू गांव” ही कविता सादर केली तर कवी संघरत्न घनघाव यांनी ”माणूसकी जळाली” कविता सादर केली. शालेय शिक्षणतज्ञ नवनाथ रणखांबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा जाधव, कार्यक्रमप्रमुख आशा रणखांबे, सहशिक्षक भास्कर विशे, शालेय शिक्षणतज्ञ नवनाथ रणखांबे, युवा कवी मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, शिक्षक संदीप पडवळ ,शिक्षिका जयश्री खंडवी, शिक्षिका कविता खारीक, शिक्षक मंगल अधिकारी, अधिक्षिका ज्योती केदारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका तनुजा जाधव यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक संदीप पडवळ यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button