Maharashtra

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

नितीन माळे

महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहून काळजी वाटली

विधानसभा निकालादिवशीच आपण पत्रकार परिषदेसाठी इथे भेटलो होतो. आज थोड्यावेळापूर्वी मी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली

शिवसेनाप्रमुख आणि त्यांच्या कुटुंबावर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप केला

देवेंद्र फडणवीसांनी अमित शाहांचा दाखला देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला, पण जनतेला सर्व माहिताय कोण खोटं बोलतंय

पहिल्या प्रथम कोणीतरी ठाकरे घराण्यावर खोटारडेपणाचा आरोप केलाय

मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार, हे वचन शिवसेनाप्रमुखांना दिलं, ते पूर्ण करण्यासाठी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही

मी शिवसेनाप्रमुखांना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री आणल्याशिवाय गप्प बसणार नाही

शाहांचा फोन आला, काय पाहिजे? मी सेनाप्रमुखांना दिलेलं वचन सांगितलं, ते म्हणाले ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, मी म्हणालो, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचं

देवेंद्र फडणवीस भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते, म्हणून पाठिंबा दिला, अन्यथा काय केलं असतं माहिती नाही, पण फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती

शिवसेना प्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली. अमित शाहांनी देवेंद्र फडणवीसांना माहिती दिली. फडणवीस यांनी आत्ता जाहीर करु नका, वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेल असं म्हटले. तसेच आत्ता सांगितलं तर पक्षात माझी अडचण होईल असं नमूद केलं.

मी नरेंद्र मोदींवर कधीच टीका केलेली नाही, त्यांनी मला धाकटा भाऊ मानलं आहे, भावा-भावाचं नातं पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा मोदींनी शोध घ्यावा

माझ्याशी न बोलता साताऱ्याची जागा घेतली. उदयनराजे मोदींना काय म्हणाले होते, त्यांनी कोणते पेढे वाटले?

खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं. आता राम मंदिराचा निर्णय लागेल. तो निर्णय न्यायालय देईन. याचं श्रेय सरकारला घेता येणार नाही. सरकारला आम्ही कायदा करुन मंदिर बांधण्याची मागणी केली. राम सत्यवचनी होता. हे काय आहेत

माझ्याकडे वेळ असूनही मी त्यांच्याशी चर्चा केली नाही. जे मला खोटं ठरवणार आहेत त्यांच्याशी कसं बोलणार. त्यांनी आमच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी तीन तीन वेळा बोलण्याचा आरोप केला. हे आमच्यावर काय पाळत ठेवत होते का?

चर्चेसाठी दरवाजे अजूनही खुले, मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करु नये, युती तोडायची की ठेवायची, याचा निर्णय भाजपने घ्यावा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button