मातोश्री फौंडेशन तर्फे रूग्णांना वर्षभर मोफत औषधी वाटप
फैजपूर सलीम पिंजारी
येथून जवळच असलेल्या पिंपरुड येथील मातोश्री फौंडेशन च्या 2ऑक्टोबर रोजी वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला यात फाउंडेशन च्या विद्यमाने विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आली
यावेळी मोफत आरोग्य तपासणी प्रसंगी रक्तदाब व मधुमेह रुग्णांना फाउंडेशन च्या माध्यमातून वर्षभर मोफत औषधी देणाचा मनोदय फाउंडेशन अध्यक्ष जनार्दन जंगले व सदस्य डॉ भूषण जंगले यांनी व्यक्त केला होता त्यानुसार आज एकूण 15 रुग्णांना मोफत औषधी फाउंडेशन उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले यांच्या हस्ते रुग्णांना वाटप करण्यात आली
याप्रसंगी फार्मसिस्ट उल्हास जंगले,रुग्ण – सुनील जंगले,लालचंद कोळी,सरस्वती कोळी,अन्नपूर्णा कोळी,मीरा कोळी,मनीषा नेहेते, चमेली नेहेते,प्रतिभा नेहेते,ईच्छाराम नेहेते,मीरा जंगले,कस्तुराबाई पाटील,चेतन कोळी, आदी मान्यवर उपस्थित होते.





