Dhule

आकाश कोळी वरील गुन्हा रद्द करुन खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कार्यवाही करा : शिवसेना

आकाश कोळी वरील गुन्हा रद्द करुन खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यांवर कार्यवाही करा : शिवसेना

राहुल साळुंके

धुळे दोंडाईचा शहरातील युवासेनेचे पदाधिकारी आकाश कोळी हे एका रुग्णाची मदत करण्यासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे गेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी श्री.दुग्गड यांचेशी रुग्णाचे नातेवाईक व रुग्णाचा वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी आकाश कोळी गेले असता रुग्ण हा मरणासन्न अवस्थेत असून त्यांच्या प्रथमोपचार करावा नंतर वाद करावा, असे सांगितले. त्यावरुन आकाश कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या संदर्भात शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्री. अतुल सोनवणे, शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके, दोंडाईचा शहरप्रमुख श्री.चेतन राजपुत, शिंदखेडा उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, दोंडाईचा शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी यांनी धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. चिन्मय पंडीत यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करुन निवेदन सादर केले.

पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले की, दोंडाईचा शहरातील युवासेनेचे पदाधिकारी आकाश दगा कोळी याच्या विरुध्द दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल दुग्गड यांनी हेतुपुरस्कर, राजकीय दबावाखाली आकाश दगा कोळी यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे खोटी व चुकीची नियोजनपूर्वक फिर्याद देवून कलम 353 व इतर कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

सदर तरुण हा दोंडाईचा शहर व परिसरातील नागरिकांसाठी वेळोवेळी गरजेप्रमाणे धावून जात असतो. तसेच गोरगरीब जनतेला मदत करुन त्यांना उपजिल्हा रुग्णलयातील सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करीत असतो. त्यामुळे साहजिक त्याच्या या वागण्यामुळे उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना इच्छा नसतांना कर्तव्य बजवावे लागते. याचा राग मनात ठेवून द्वेषबुध्दीने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटनेची माहिती घेतली असता असे आढळून आले आहे की, श्री.आकाश कोळी हे कोविड-19 संबंधीत रुग्णांना मदतीसाठी गेले होते. त्या दरम्यान श्री.अतुल राजेंद्र कुंभार यांचे वडील राजेंद्र कुंभार अत्यावस्त अवस्थेत दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यांनी उपजिल्हा रुग्णलयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनवणी करुन आपल्या वडीलांना ताबडतोब उपचार सुरु करण्याबाबत मागणी केली. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता व कुठलाही प्रथमोपचार न करता ॲडमिट करुन घेण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व संबंधित रुग्णांचे नातेवाईक यांच्यात वाद सुरु असतांना श्री.आकाश कोळी रुग्णाला मदत व वाद कमी करण्यासाठी तेथे पोहोचले असता वैद्यकीय अधिकारी श्री. दुग्गड यांनी श्री.आकाश कोळी यांच्याशी हुज्जत घातली व तावातावात रुग्णाला कुठलाही उपचार न करता निघून गेले. श्री. दुग्गड यांचे बाबतीत अनेक तक्रारी शिवसेनेकडे आलेल्या आहेत. त्यांची कार्यपध्दती रुग्णास व नातेवाईकांना अपमानीत करणारी आहे. त्यामुळेच आकसबुध्दीने युवासेनेचे श्री.आकाश कोळी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हा रद्द करण्यात यावा व संबंधितांवर कार्यवाही करावी असेही निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button