Amalner

पीक विमा पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द

पीक विमा पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज रद्द

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

बनावट सीएससी सेंटर उघडून पीक विमा पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी गिरीश बिरारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र व अति रद्द केला आहे.

आरोपी गिरीश बिरारी यांनी 2017 पासून हेडावे , गडखांब, हिंगोणें , दहिवद , तासखेडा , खोकरपाट , सडावन , वंजारी , नगाव , बिलखेडा , वावडे , मांडळ , मंगरूळ , धानोरा , एकलहरे आदी गावातली सुमारे 61 शेतककर्यांकडून पीक विम्याच्या हप्त्यापोटी 1 लाख 58 हजार 465 रुपयांचे हप्ते वसूल करून त्यांच्या 46 लाख 10 हजार 533 रुपयांचे पीक विम्याचे नुकसान झाले आहे रवींद्र भाऊराव पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसात वेदांतचे मालक गिरीश विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात होता. त्याचा कॉम्प्युटर मधील डाटा व त्यात तयार बनावट लिंक याबाबत शोध व जप्त करण्यासाठी आरोपीचा जामीन नाकारावा असा युक्तिवाद सरकारी वकील एड किशोर बागुल मंगरुळकर यांनी केला सदर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र व अति न्यायाधीश व्ही आर जोशी यांनी रद्द केला आहे. सरकार पक्षातर्फे एड किशोर बागुल मंगरुळकर तर फिर्यादीतर्फे एड सलीम खान यांनी काम पाहिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button